महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अतिवृष्टी नुकसानीची लवकरच भरपाई

12:01 PM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून अहवाल देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : हुक्केरी, अथणी, चिकोडी तालुक्यांमध्ये अधिक नुकसान

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरांच्या पडझडीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची लवकरच भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान झालेल्या घरांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात यावी. तर कृषी आणि बागायत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून पोर्टलवर नुकसानीबाबत माहिती अपलोड करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकारच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या घरांची माहिती उपलब्ध आहे. यासंदर्भात लवकरच भरपाई देणे गरजेचे आहे. भरपाईमध्ये कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये, हानी झालेल्या ठिकाणी स्वत: भेट देऊन पाहणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. सरकारच्या मार्गदर्शनानुसार घरांची नुकसानभरपाई देण्यासाठी पाहणी करावी. वर्गवारी करून माहिती अपलोड करण्याची सूचना त्यांनी केली. बेळगाव तालुक्यातील हानी झालेल्या चार घरांना यापूर्वीच भरपाई देण्यात आली. इतर उर्वरित घरांच्या नुकसानीची नोंद घेऊन सरकारच्या मार्गदर्शनानुसार भरपाई देण्याची सूचना त्यांनी केली.

Advertisement

हुक्केरी, अथणी, चिकोडी या तालुक्यांमध्ये अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण करावे, तहसीलदार, कृषी खात्याच्या व बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने पथकांची नियुक्ती करून आठवडाभरात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्यामध्ये पावसामुळे 100 कि. मी. रस्त्याचे नुकसान झाल्याची माहिती असून याबाबतचे सर्वेक्षण करून नवीन रस्ते व दुरुस्तीसाठी अहवाल देणे गरजेचे असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी नुकसानीबाबतचा अहवाल त्वरित गतीने द्यावा. यामध्ये पारदर्शकता ठेवण्यात यावी. यापूर्वी नुकसान झालेल्या घरांचीही माहिती देण्यात यावी. सदर माहिती नोंद ठेवणे आवश्यक आहे. सर्व तालुक्यांतील ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना त्यांनी केली. याबरोबरच अंगणवाडी, शाळा इमारती याबाबतचा अहवाल देण्याची सूचना जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article