‘कनप्पा’मध्ये झळकणार अक्षय कुमार
तेलगू चित्रपटात कॅमियो भूमिका
अक्षय कुमार तेलगू चित्रपटात कॅमियो भूमिका करणार आहे. कनप्पा या चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर करण्यात आले असून त्याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.
अक्षय कुमारचा चित्रपट ‘कनप्पा’ची पहिली झलक समोर आली असून यात तो भगवान शिव यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. विष्णू मांचू यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘कनप्पा’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर हा पाच भाषांमध्ये सादर करण्यात आला आहे. चित्रपटात प्रभास, अक्षय कुमार, काजल अग्रवाल, मोहनलाल यांच्याह अनेक कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळी, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाणर आहे. या महाकाव्याच्या कहाणीला आता जगभरातील प्रेक्षक पाच भाषांमध्ये पाहू शकणार आहेत.
कनप्पाची कहाणी भगवान शिव यांचा एक भक्त कनप्पाची आहे. तो शिवाच्या भक्तीत स्वत:चे डोळे फोडून घेत असल्याचे दाखविले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंह यांनी केले असून याची निर्मिती मोहनबाबू यांनी केली आहे.