For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सोनिया गांधी, नड्डा राज्यसभेवर; अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांनाही ‘लॉटरी’

11:18 PM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनिया गांधी  नड्डा राज्यसभेवर  अशोक चव्हाण  मिलिंद देवरा यांनाही ‘लॉटरी’
Sonia Gandhi

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याआधी पक्ष त्यांना हिमाचल प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीत उतरवू शकतो, अशी चर्चा होती. पण खुद्द जेपी ननड्डा यांनी निवडणूक वचनबद्धतेचा हवाला देत हे नाकारले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही राज्यसभेचे तिकीट देण्यात आले असून ते महाराष्ट्रातून राज्यसभेत पोहोचणार आहेत. काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेले मिलिंद देवरा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद देवरा उद्या म्हणजेच गुऊवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Advertisement

राज्यसभा उमेदवारांच्या यादीत बुधवारी सात नावांची घोषणा करण्यात आली आहे. गुजरातमधून चार आणि

Advertisement

महाराष्ट्रातून तीन जणांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. जगत प्रकाश ननड्डा यांच्याशिवाय गुजरातमधून राज्यसभेवर जाणाऱ्यांमध्ये गोविंदभाई ढोलकिया, मयंक भाई नायक आणि जसवंतसिंग सलामसिंग परमार यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेचे तिकीट मिळालेल्यांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशिवाय मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांची नावे आहेत.

गुजरातमधून गोविंदभाई ढोलकियांना संधी

जे. पी. नड्डा यांच्याशिवाय गुजरातमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. गोविंदभाई ढोलकिया यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी करोडो ऊपयांची देणगी दिली होती. ढोलकिया हे मूळचे गुजरातमधील सुरतचे असून ते अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. 1992 मध्ये रामजन्मभूमी आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. दरवषी दिवाळीदरम्यान आपल्या हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मौल्यवान भेटवस्तू भेटीदाखल प्रदान केल्यामुळे गोविंदभाई ढोलकिया हे चर्चेत असतात.

सोनिया गांधींनी राजस्थानमधून दाखल केला उमेदवारी अर्ज

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. सोनिया गांधी यांनी बुधवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकनापूर्वी सोनियांनी विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या लॉबीमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. सोनिया गांधी यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनीही जयपूर गाठले. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासरा आणि विरोधी पक्षनेते टिकाराम जुली हे त्यांचे प्रस्तावक होते. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवली होती.

काँग्रेसने बुधवारी चार राज्यांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात राजस्थानमधून सोनिया गांधी आणि बिहारमधून अखिलेश प्रताप सिंग, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोनिया गांधी बुधवारी सकाळी जयपूरला पोहोचल्या होत्या. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली.

आता राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. भाजपने राजस्थानमधून दोन उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये मदन राठोड आणि चुन्नीलाल गरसिया यांचा समावेश आहे. हे दोघेही गुऊवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्यासह राज्य सरकारचे अनेक मंत्री आणि आमदारही त्यांच्या नामांकनावेळी उपस्थित राहणार आहेत.

20 फेब्रुवारीला चित्र स्पष्ट होणार

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 8 फेब्रुवारीपासून सुऊवात झाली आहे. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. 16 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला आपले नाव मागे घ्यायचे असल्यास त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत ते करता येणार आहे. आवश्यकता भासल्यास 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल.

सामाजिक, जातीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि पुऊषोत्तम ऊपाला (गुजरात) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (महाराष्ट्र) यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. मात्र, या नेत्यांची राज्यसभेची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. पक्ष त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते अशी चर्चा आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 14 जणांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यात उत्तर प्रदेशमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीच्या माध्यमातून भाजपने सामाजिक आणि जातीय समीकरणे साधण्याचे काम केले आहे. दलित आणि इतर समाजातील मागास घटकांना प्रतिनिधित्व देऊन पक्ष सर्वांसाठी समानतेने काम करत आहे आणि त्यासाठी समाजातील सर्व घटक तितकेच महत्त्वाचे आहेत हा संदेश देऊ इच्छितो. त्यामुळेच उत्तर प्रदेश तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातून समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement
Tags :
×

.