For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनिया गांधी बिनविरोध राज्यसभेवर; भाजप अध्यक्ष नड्डांचीही निवड बिनविरोध

06:35 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनिया गांधी बिनविरोध राज्यसभेवर  भाजप अध्यक्ष नड्डांचीही निवड बिनविरोध
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी राजस्थानातून बिनविरोध राज्यसभेवर निवड झाली आहे. तसेच भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठौड हे देखील राजस्थानातून राज्यसभेवर पोहोचले आहेत. राजस्थानातील राज्यसभेच्या 3 जागांवर तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सोनिया गांधी आता पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात दिसून येणार आहेत.

राजस्थानातून राज्यसभा खासदार डॉ. मनमोहन सिंह (काँग्रेस) आणि भूपेंद्र सिंह (भाजप) यांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. तर एका रिक्त जागेकरिता निवडणूक झाली आहे, कारण भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीणा यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Advertisement

गुजरातमध्ये 4 ही जागा भाजपकडे

तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा हे गुजरातमधून राज्यसभेवर पोहोचणार आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत्या. या जागांवर नड्डासोबत गोविंद ढोलकिया, जशवंत सिंह परमार आणि मयंक नायक हे बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभेत प्रचंड बहुमत असल्याने गुजरातमधून भाजपचे चारही नेते राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

मध्यप्रदेशात भाजपचा वरचष्मा

मध्यप्रदेशात देखील भाजप 4 आणि काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. यात भाजपचे एल. मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नरोलिया, बन्सीलाल गुर्जर यांचे नाव सामील आहे. तर काँग्रेसच्या वतीने अशोक सिंह हे राज्यातून राज्यसभेवर पोहोचणार आहेत.

बिहारमध्येही बिनविरोध

बिहारमध्ये सर्व 6 उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेसाठी बिहारमध्ये भाजपचे 2, राजदचे 2 तर संजद अन् काँग्रेसचा प्रत्येकी एक उमदवार निवडणुकीच्या मैदानात होता. हे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपने भीम सिंह आणि धर्मशीला गुप्ता यांना उमेदवारी दिली होती. तर संजदकडून संजय झा हे राज्यसभेवर जाणार आहेत. राजदकडून मनोज झा आणि तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने अखिलेश प्रसाद सिंह यांना राज्यसभेवर पाठविले आहे.

Advertisement
Tags :

.