कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘दीवानियत’मध्ये सोनम बाजवा

06:21 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत

Advertisement

चित्रपट सनम तेरी कसमच्या पुनर्प्रदर्शनानंतर हर्षवर्धन राणेचा नवा चित्रपट ‘दीवानियत’ची घोषणा करण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या नायिकेचे नावही जाहीर करण्यात आले आहे. हर्षवर्धन राणेच्या या चित्रपटात पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवाची निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट मिलाप जवेरी दिग्दर्शित करणार आहे. यात प्रेमाचा वेगळा पैलू दाखविणारी कहाणी मांडली जाणार आहे. तर याची निर्मिती अमूल मोहन यांच्याकडून केली जाणार आहे.

Advertisement

चित्रपटाचा मोशन टीझर सोनमने शेअर केला आहे. या मोशन टीझरमध्ये सोनम बाजवाच्या आवाजात एक डायलॉग ऐकू येतो, ज्यात ती ‘ तेरा प्यार, प्यार नहीं तेरी जिद्द है. जिसे तू पार कर रहा है, वो हर हद की हद है’ असे म्हणत असल्याचे ऐकू येते. दीवानियत या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षीच सुरू होणार आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटावरून हर्षवर्धनचे चाहते उत्सुक झाले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article