एमसीयूत क्रिस इवान्सची वापसी
एव्हेंजर्स डूम्सडेमध्ये दिसून येणार
क्रिस इवान्स मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये दमदार वापसी करण्यासाठी तयार आहे. यावेळी तो जो आणि अँथनी रुसोच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट एव्हेंजर्स डूम्सडेमध्ये दिसून येणार आहे. एंथनी रुसो या चित्रपटात सॅम विल्सन ही व्यक्तिरेखा कॅप्टन अमेरिका म्हणून परत दर्शविणार आहे. यामुळे क्रिस इवान्स हा कॅप्टन अमेरिकेच्या वेशभूषेत दिसण्याची शक्यता कमी आहे. तरीही चित्रपटात क्रिस रोजर्सच्या स्वरुपात तो परतणार असल्याचे मानले जात आहे.
क्रिस इवान्सने एमसीयूचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘डेडपूल अँड वूल्वरिन’मध्ये विशिष्ट भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने स्वत:ची जुनी व्यक्तिरेखा जॉनी स्टार्म पुन्हा साकारली होती. ही व्यक्तिरेखा फँटास्टिक फोर चित्रपटांमधील होता. क्रिस इवान्सची स्टीव रॉजर्सची व्यक्तिरेखा यापूर्वी रुसो ब्रदर्सकडून दिग्दशिंत एवेंजर्स-एंडगेममध्ये दिसून आली होती.
रुसो ब्रदर्सच्या नव्या चित्रपटात एमसीयूच्या अनेक पसंतीच्या व्यक्तिरेखा पुन्हा पहायला मिळणार आहेत. यानुसार रॉबर्ट डाउनी ज्युनियर हे डॉ. डूम ही व्यक्तिरेखा साकारतील. एवेंजर्स डूम्सडेमध्ये पेड्रो पास्कल, जोसेफ क्विन, वनेसा किर्बी आणि एबोन मोस-बॅकरेक देखील दिसून येणार आहे.