सोनाली सहगलला कन्यारत्न
प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगल आणि तिचा पती अशेष सजनानी यांच्या घरात नव्या पाहुणीने प्रवेश केला आहे. या दांपत्याच्या घरी एक मुलगी जन्माला आली आहे. सोनाली अणि तिच्या नवजात मुलीची प्रकृती उत्तम असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. सोनाली सहगल आणि अशेषने 7 जून 2023 रोजी विवाह केला होता. त्यांच्या या विवाहसोहळ्याला दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. अभिनेत्री स्वत:च्या गरोदरपणावरून अत्यंत उत्साही होती, तिने पूर्ण जर्नी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसमोर व्यक्त केली होती. सोनाली सहगलने 2006 साली मिस इंटरनॅशनल ब्यूटी पेजेंटमध्ये भाग घेतला होता. सोनाली ही कार्तिक आर्यन आणि सनी सिंह यांच्यासोबत प्यार का पंचनामा या चित्रपटात दिसून आली होती. यानंतर ती सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटातही झळकली होती. 2015 मध्ये तिने वेडिंग पुलाव, प्यार का पंचनामा 2 तर 2019 मध्ये सेटर्स या चित्रपटांमध्ये काम केले होते.