For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

23 जूनला विवाहबद्ध होणार सोनाक्षी

06:41 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
23 जूनला विवाहबद्ध होणार सोनाक्षी
Advertisement

प्रियकर जहीर इक्बालसोबत संसार थाटणार

Advertisement

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा  चालू महिन्यातच प्रियकर जहीर इक्बालसोबत विवाह करणार आहे. कुटुंबीयांची संमती मिळविल्यावर सोनाक्षी ही 23 जून रोजी जहीरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षीने ‘हीरामंडी’ या सीरिजच्या प्रमोशनवेळी एका कार्यक्रमात विवाह करण्यासाठी अत्यंत आतुर असल्याचे म्हटले होते. याद्वारे तिने विवाहाचे संकेत चाहत्यांना दिले होते.

सोनाक्षी आणि जहीर हे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेकदा जाहीरपणे एकत्र दिसून आले आहेत. सोनाक्षी आणि जहीरचा मित्रपरिवार तसेच कुटुंबीयांसोबत हीरामंडी सीरिजमधील सर्व कलाकारांना विवाहसोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. दोघांच्या विवाहाची निमंत्रणपत्रिकाही समोर आले असून त्यावर ‘अफवाहें सच हैं’ असा उल्लेख आहे. सोहळ्याकरता अतिथींना फॉर्मल कपडे परिधान करून येण्यास सांगण्यात आले आहे. तर विवाहानंतर स्वागत सोहळा मुंबईत होणार आहे.

Advertisement

जहीर हा अभिनेता सलमान खानचा जवळचा मित्र आहे. तसेच त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी व्यवसायांची आहे. तर सोनाक्षी ही अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आहे. सोनाक्षी मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असली तरीही तिला स्वत:चे स्थान निर्माण करता आलेले नाही.

Advertisement
Tags :

.