महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘काकुडा’मध्ये सोनाक्षी सिन्हा

12:31 PM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोनाक्षी सिन्हाने अलिकडेच जहीर इक्बालसोबत विवाह केला आहे. 23 जून रोजी अभिनेत्री विवाहबंधनात अडकली होती. स्वत:च्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केल्यावर सोनाक्षी पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रीय झाली आहे. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट ‘काकुडा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

मुंज्या या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर यश मिळविल्यावर आदित्य सरपोतदार आणखी एका हॉरर कॉमेडीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्याचा काकुडा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Advertisement

काकुडामध्ये सोनाक्षी ही इंदिरा नावाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. ‘इंदिरा भूतप्रेतांवर विश्वास ठेवत नाही, परंतु काकुडाचा क्रोध अत्यंत व्यक्तिगत असणार आहे. ती या हानीपासून वाचू शकेल का’ असे पोस्टर शेअर करत सोनाक्षीने म्हटले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख आणि साकिब सलीम यासारखे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. रोनी स्क्रूवालाकडून निर्मित या चित्रपटात एका गावामध्ये अभिशापाची कहाणी दाखविली जाणार आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजी झी5 वर स्ट्रीम होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article