For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनाक्षीला मिळाला नवा चित्रपट

06:49 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनाक्षीला मिळाला नवा चित्रपट
Advertisement

अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

Advertisement

सोनाक्षी सिन्हा लवकरच ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात दिसून येणार आहे. सोनाक्षीला आता आणखी एक चित्रपट मिळाला आहे. सोनाक्षी लवकरच विशाल राणाच्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. याचे दिग्दर्शन करण रावल करणार आहेत. विशाल राणा आणि सोनाक्षी  या दोघांनीही या आगामी चित्रपटावरून स्वत:चा आनंद व्यक्त केला आहे.

इकोलोन प्रॉडक्शन्सचे प्रमुख विशाल राणा हे सोनाक्षीसोबत स्वत:चा आगामी रोमँटिक थ्रिलर चित्रपट निर्माण करणार आहेत. करण रावलने याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. इकोलोन प्रॉडक्शन्ससोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. मी नेहमीच नव्या आणि चांगल्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उत्साहित असते. हा चित्रपट माझ्या पुढील प्रवासाला दिशा देणारा असल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे.

Advertisement

या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. बडे मियां छोटे मियां हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेत दिसून येतील. दोघेही स्वत:च्या अॅक्शनदृश्यांसाठी ओळखले जातात. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.