महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅमेरुन डियाजला पुत्ररत्न

06:21 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वयाच्या 51 व्या वर्षी दिला जन्म

Advertisement

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅमेरून डियाज पुन्हा एकदा आई झाली आहे. कॅमेरूनने वयाच्या 51 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. कॅमेरून आणि तिचा पती बेंजी मेडेनने सोशल मीडियावर ही गूड न्यूज शेअर केली आहे.

Advertisement

तसेच दांपत्याने या मुलाचे नाव जाहीर केले आहे. मुलाची छायाचित्रे सध्या शेअर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही आमचा मुलगा कार्डिनल मेडेनच्या जन्माची घोषणा करताना अत्यंत धन्य आणि उत्सुक आहोत. तो अत्यंत प्रेमळ आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत. मुलाची सुरक्षा आणि खासगीत्व जपण्यासाठी आम्ही कुठलीच छायाचित्रे पोस्ट करणार नाही असे त्यांनी नमूद केले आहे.

कॅमेरून-बेंजी या दांपत्याला एक मुलगी देखील आहे. 2015 मध्ये या दांपत्याने सरोगसीद्वारे मुलगी रेडिक्सचे स्वागत केले होते. अभिनेत्रीने 2015 मये मॅडेनसोबत विवाह केल्यावर स्वत:च्या कारकीर्दीतून विराम घेत खासगी जीवनाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला होता. कॅमेरून यापूर्वी 2014 मध्ये एनी या चित्रपटात दिसून आली होती. कॅमेरून आता होममेकरच्या भूमिकेचा आनंद घेत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article