Sangli Crime : दारूसाठी मुलाने केला आईचा खून...!
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाकडून जन्मदात्या आईचा खून
तासगाव : तासगांवातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचा मुलानेच तलवारीने वार करून खून केला आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून त्या मुलाविरूध्द गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली. शांताबाई चरण पवार (वय ७०.) असे या आईचे नाव आहे. त्यांचा मुलगा उपकाऱ्या चरण पवार (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) यांनी भाऊ जगणु उर्फ जगण्या चरण पवार (वय ४५) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मयत शांताबाई इंदिरानगर येथे एकट्या राहत होत्या. शांताबाई व जगण्या पवार या दोघांना दारूचे व्यसन आहे. फिर्यादी उजव्या पायाने लंगडत चालतात. मंगळवार १४ रोजी फिर्यादी पुण्याहून तासगांव येथे आले होते. त्यांची पत्नी घरी नसल्याने त्यांना जेवण बनविण्यासाठी आई शांताबाई फिर्यादी यांच्या घरी राहत होत्या. बुधवार १५ रोजी ८.३० च्या दरम्यान फिर्यादींच्या आईने घरी जेवण तयार केले होते व फिर्यादी व त्यांच्या आई शांताबाई जेवायला ताटे घेणार होते. इतक्यात फिर्यादी यांचा लहान भाऊ जगण्या पवार तलवार घेवुन घरात आला. आई शांताबाई यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी शांताबाई यांनी आता तू जा उद्या बघू असे म्हणाल्या. त्यावर जगण्याने शांताबाई यांच्या केसास धरून जमिनीवर पाडले. तू मला दारू पिण्यासाठी पैसे देत नाहीस ना, असे म्हणून त्यांच्या पोटावर डाव्या बाजूस, कानाजवळ वार करून डावी बरगडीत तलवार खुपसली.
फिर्यादी हे लंगडत असल्याने त्यांना काही न बोलता आपल्यास मारेल म्हणून काठीचा आधार घेत ते घराबाहेर आले व वडिलांसह इतरांना घडलेल प्रकार सांगितला. भाऊ जगण्या चरण पवारने आई शांताबाईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तलवारीने वार करून तिचा खून केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोव भवड, निरीक्षक सोमनाथ वाघ, सहायक निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षव राजू अन्नछत्रे, विनय गोडसे व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली
याप्रकरणी अटकेतील जगणु उर्फ जगण्या चरण पवार यांना गुरूवारी तासगां न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी दिल्याचे तपास अधिकारी राजू अन्नछत्रे यांनी सांगितले.