महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंदिरांची नगरी सोमनाथ

06:07 AM Nov 28, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेससाठी तुलनेत अनुकूल असलेला मतदारसंघ

Advertisement

सोमनाथ या धार्मिक नगरीत निवडणूक प्रचाराकरता अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत सभा घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 नोव्हेंबर रोजी सोमनाथाचे दर्शन घेण्यासह वेरासाल येथे जाहरी सभेला संबोधित केले आहे. विशाल समुद्र किनारा अन् जंगलाने वेढलेल्या सोमनाथ मतदारसंघात 1962 पासून आतापर्यंत 13 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यातील 8 वेळा काँग्रेस तर दोनवेळा भाजपने विजय नोंदविला आहे. जशाभाई बराड हे चारवेळा येथे काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. 2017 मध्ये बराड यांनी पक्षांतर केले आणि भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत उभे राहिले, परंतु काँग्रेसचे विमलभाई चुडासामा यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. भाजपला या मतदारसंघात sकवळ 1998 आणि 2007 साली विजय मिळाला आहे. 2007 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गिर सोमनाथच्या 4 पैकी 3 जागा जिंकण्यास यश मिळाले होते. 2012 मध्ये केवळ भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. तर 2017 मध्ये भाजपला येथे खातेही उघडता आले नव्हते. परंतु सोमनाथ येथील लोकसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले असून राजेश चुडासामा येथील खासदार आहेत.

Advertisement

काँग्रेसने यावेळी विद्यमान आमदार विमलभाई चुडासामा यांनाच तिकीट दिले आहे. विमलभाई हे या क्षेत्रातील प्रमुख कोळी नेते आहेत. या विधानसभा मतदारसंघात कोळी समुदायाचे 40 हजार मतदार आहेत. मुस्लीम मतदारांची संख्याही 40 हजारांच्या आसपास आहे. मतदारसंघाची स्थिती पाहता भाजपने यावेळी नव्या चेहऱयाला संधी दिली आहे. मानसिंह परमार हे भाजपच्या तिकीटावर निवडणुकीत उभे राहिले आहेत. परमार हे कराडिया समुदायाशी संबंधित आहेत. या समुदायाचे येथे सुमारे 20 हजार मतदार आहेत.

मंदिरावर निर्भर शहराची अर्थव्यवस्था

सोमनाथ शहर पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सुविधांनी युक्त असून स्वच्छ आहे. समुद्र किनाऱयाशी जोडलेला मंदिर परिसर नेहमीच भाविकांनी भरलेला दिसून येतो. येथील अर्थव्यवस्थेत या मंदिराची अत्यंत मोठी भूमिका आहे. मंदिरामुळेच शहरातील बहुतांश लोकांची उपजीविका चालते. वर्षभर मोठय़ा संख्येत भाविक येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांना लाभ होत आहे.

‘आप’चा प्रभाव

आम आदमी पक्षाने या मतदारसंघात जगमाल वाला यांना उमेदवारी दिली आहे. येथील तरुणाईमध्ये आम आदमी पक्षाबद्दल उत्सुकता आहे. परंतु ही उत्सुकता किती प्रमाणात मतदानात रुपांतरित होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गिर सोमनाथच्या चारही मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने भाजपने यावेळी पूर्ण शक्तिनिशी प्रचार चालविला आहे. पंतप्रधना नरदें मोदींनी 20 नोव्हेंबर रोजीच्या वेरावल येथील सभेत भूमिपुत्र असल्याचे सांगत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर काँग्रेसला जातीय समीकरणंवर भरवसा आहे. सोमनाथ मतदारसंघात 2 लाख 42 हजार मतदार आहेत. येथे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article