मृत्यू समीप येताच काहींना होतो आनंद
संशोधनात समोर आले कारण
एका संशोधनानुसार मृत्यूच्या भीतीशी लढणारे लोक स्वत:च्या अखेरच्या क्षणी सकारात्मक भाषेचा वापर करतात. मृत्यू समीप येताच जीवनावरून एक नवी समज विकसित होते आणि लोक जीवनातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देऊ लागतात. याचे उदाहरण अलिकडेच ब्रिटनमध्ये दिसून आले आहे. सायमन बोआस हे कर्करोगामुळे आजारी होते. 15 जुलै रोजी वयाच्या 47 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. निधनापूर्वी त्यांनी बीबीसीला मुलाखत दिली होती. यात माझ्या वेदना नियंत्रित असून मी अत्यंत आनंदी आहे, हे ऐकण्यास विचित्र वाटत असले तरी मी माझ्या जीवनात पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आहे असे सायमन यांनी नमूद केले होते.
मृत्यूपूर्वी जीवनाचा अर्थ समजणे
सायमन बोआस यांनी स्वत:चे अनुभव शेअर केले होते. स्वत:ची स्थिती मी स्वीकारली होती आणि जीवनातील छोट्यातील छोट्या आनंदावर लक्ष केंद्रीत केले. आयुष्य किती मोठे आहे हे आमच्या मानसिकतेवर निर्भर असते हे रोमचे विचारवंत सेनेका यांचे शब्द त्यांनी उच्चारले होते. मनोवैज्ञानिक विक्टर फ्रँकल यांनीही स्वत:च्या अनुभवांद्वारे जीवनात कुठल्याही स्थितीत अर्थ शोधणे आवश्यक असल्याचे सिद्ध केले आहे.
सामाजिक संबंध अन् साधारण आनंदाचे महत्त्व
एका अध्ययनात आढळून आले की मृत्यू समीप येताच लोक सामाजिक संबंध, निसर्गाचे सौंदर्य आणि साधारण गोष्टींद्वारे स्वत:चा आनंद मिळवितात. जसजसे त्यांचे आरोग्य बिघडू लागते, त्यांचे लक्ष सुखापासून हटून जीवनाचा अर्थ अणि संतुष्टीच्या दिशेने केंद्रीत होते.
मृत्यूच्या दारी कशा असतात भावना
मृत्यू जवळ येऊन ठेपल्यावर लोक आनंदासोबत दु:ख, संताप, पश्चाताप आणि समाधान यासारख्या अनेक भावनांचा अनुभव घेतात. हे जीवनाबद्दलची नवी समज आणि दृष्टीकोनाचा संकेत देते. जे त्यांना जीवनाच्या अंतिम दिवसांमध्ये आनंदाचा अनुभव करण्याची शक्ती देते. जीवनाच्या अखेरच्या काळात शांतता आणि समाधान मिळविले जाऊ शकते हा विचारच लोकांना स्वत:च्या जीवनाच्या अखेरच्या क्षणांपर्यंत आनंदाने जगण्याची प्रेरणा देत असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.