महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मारुती सुझुकीच्या काही कार्स झाल्या स्वस्त

06:44 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चारचाकी वाहन निर्माती दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने आपल्या काही प्रकारातील कार्सच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक जूनपासूनच  मारुती सुझुकीने आपल्या काही कार्सच्या किंमती केल्या आहेत.

Advertisement

कोणत्या कार्स स्वस्त

जवळपास नऊ प्रकारातील कार्सच्या किमती कंपनीने कमी केल्या आहेत. यामध्ये अल्टो के 10, एक्सप्रेसो यांच्या किमती 5हजार रुपयापर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सेलेरिओ, वेगनार यांच्या किमतीसुद्धा 5हजार रुपयांनी कमी केल्या आहेत. स्विफ्ट, डिझायर, बलेनो, फ्राँक्स आणि इग्निस यासारख्या कार्सच्या किमतीसुद्धा 5 हजार रुपयांपर्यंत घटवण्यात आल्या असल्याचे समजते. एकाअर्थी या कार्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किमतीतील दिलासा मिळू शकणार आहे.

एप्रिलमध्ये वाढल्या होत्या किंमती

मागच्या एप्रिल महिन्यामध्ये मारुती सुझुकीने निर्मिती खर्चामध्ये होणाऱ्या वाढीमुळे काही कार्सच्या किमती वाढवल्या होत्या. यामध्ये स्विफ्टची किंमत 25 हजार रुपयांनी तर ग्रँड विटारा सिग्मा कारची किंमत 19 हजार रुपयांनी महाग झाली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article