For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अग्निशामक दलात काही जवान सरकारी जावई

12:43 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अग्निशामक दलात काही जवान सरकारी जावई
Advertisement

एकाच ठिकाणी ठाण, बदली करण्यास गेल्यास राजकीय गॉडफादरचे मुख्यालयात फोन, 15 वर्षांपासून अनेक जवान बढतीपासून वंचित

Advertisement

गिरीश मांद्रेकर /म्हापसा

राज्य अग्निशामक दलात गेल्या 20 वर्षापासून सेवेत ऊजू झालेले 200 हून अधिक जवान एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले असून काहीजण आपले राजकीय वजन वापरून आपल्या घराजवळ अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी बसून आहेत.यात मुख्यालयातील जवानांचा अधिक भरणा असून काही प्रमुख अग्निशामक दलाच्या कार्यालयातही हीच परिस्थिती आहे. येत्या काही दिवसात अधिकारीवर्ग तसेच फायर फायटर तसेच कार्यालयीन स्टाफच्या बदल्यांचा आदेश निघणार असून तत्पूर्वी या खात्यात 20 वर्षाहून अधिक काळ एकाच जागेवर अडून बसल्यांची अन्यत्र बदली करावी अशी मागणी होत आहे.

Advertisement

काही अधिकारीवर्गांच्या बदल्या यापूर्वी झाल्या असल्या तरी आपले वजन वापरून ते पुन्हा त्याच अग्निशामक  कार्यालयात येत आहेत. या दलाचे संचालक पी. के. जॉन, नंतर अशोक मेनन व आता नितीन रायकर असताना सुमारे 20 वर्षांच्या कालावधीपासून काही जवान तसेच अधिकारीवर्ग एकाच ठिकाणी ठाण मारून बसलेले आहेत. त्यांची बदली करण्यास गेल्यास वरिष्ठ अधिकारीवर्गांना त्वरित राजकीय फोन मुख्यालयात घणघणतात. त्यामुळे त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  दुर्लक्ष होते.आपल्या गॉडफादराच्या आधारे काही अधिकारीवर्ग तसेच जवान दादागिरीची भाषा बोलतात. त्यामुळे काही अधिकारीवर्ग त्यांच्याकडे न लक्ष घातलेलेच बरे त्यापेक्षा आपले काम अधिक बरे असा प्रकार या खात्यात चालल्याचे आम्हाला पहायला मिळते अशी माहिती सुत्रांनी दिली.

बढतीअभावी जवानांमध्ये नाराजी

गेल्या 20 वर्षांपासून या खात्यात बढती देण्यात आलेली नाही, त्यामुळे काही जवानांमध्ये नाराजी पसरली आहे. आम्ही शेवटी या खात्यात राबून काय उपयोग. अनेक वर्षे काम करून आमची बढती नाही. आता कधी निवृत्त झाल्यावर आम्हाला बढती मिळेले काय, असा सवाल जवानांमध्ये उपस्थित होत आहे. अद्याप बढती सत्र सुरू करण्यात आले नसल्याने फायर फायटर, लिडींग फायरमेन, फायरमेन, उपअधिकारी यांची बढती राहून जाते असे या खात्यातील अधिकारीवर्गांचे म्हणणे आहे.

काही कार्यालयांत जवानांची कमतरता

दरम्यान, राज्यातील काही अग्निशामक दलाच्या कार्यालयात फेरफटका मारला असता काही कार्यालयात जवानांची कमतरता भासत असल्याचे सांगण्यात आले. अलीकडेच पणजी मुख्यालयात अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात दलाच्या प्रत्येक कार्यालयात 50 जवान देण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही नाही असे फेरफटका मारला असता आढळून आले आहे. मुख्यालय पणजी, फोंडा, मडगाव, म्हापसा या चार ठिकाणी वगळता तसे इतरत्र ही संख्याच आढळून येत नाही.  नवनिर्वाचित संचालक नितीन रायकर हे पूर्वी उपसंचालक होते. अशोक मेनन निवृत्त झाल्यावर रायकर यांना बढती मिळाल्यावर ते या खात्याचे संचालक झाले. ते फायर फायटर लिडींग फायर अधिकारी, उपअधिकारी, स्टेशन अधिकारी, उपसंचालक ते संचालक पदावर पोचले आहेत. त्यांना या खात्याचा खूप अनुभव आहे. कोण कुठे ठाण मांडून आहेत, या खात्यात काय चालले आहे याची सर्व त्यांना माहिती  आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या खात्यात ठाण मांडून बसलेल्या जवानांची इतरत्र बदली करण्याच्यादृष्टीने ते कुठली भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

इंधनच्या भरमसाठ बिलाबाबत ऑडीट सुरू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश

दरम्यान 28 मे रोजी तऊण भारतने अग्निशामक दलात इंधनाच्या बिलासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेतली असून याचा अहवाल आपल्यास त्वरित सादर करावा असे म्हटले आहे. मात्र याबाबत खात्याने आपला अहवाल सादर केला नसल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.