For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृत्तपत्र समुहासमोरील असणाऱ्या समस्या सोडवा

06:40 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृत्तपत्र समुहासमोरील असणाऱ्या समस्या सोडवा
Advertisement

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

दि इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच वृत्तपत्र समुहासमोर असणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली.

Advertisement

या बैठकीत नवीन दर धोरण समिती स्थापन करणे, न्यूज प्रिंटवरील 5 टक्के सीमाशुल्क रद्द करणे, डिजिटल न्यूजच्या सबस्क्रिप्शनसाठीचा जीएसटी रद्द करणे, सीबीसीमधील इंग्रजी वृत्तपत्रांना मिळणारे झुकते माप व भारतीय वृत्तपत्रांचे संयुक्त राष्ट्र संघाकडून अधिकृत भाषांमध्ये भाषांतर करणे, ई पेपरसाठी स्वतंत्र दर धोरण ठरविणे, ऑडिटेड सर्क्युलेशन सर्टिफिकेट्स सादर करण्याचा कालावधी वाढवून देणे, तसेच मुद्रित माध्यमांसाठी सीबीसीचे अंदाजपत्रकाचा पुनर्विचार करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी बैठकीसाठी पूर्ण वेळ देऊन शिष्टमंडळाचे म्हणणे  ऐकून घेतले. तसेच आपल्या सर्व मागण्यांबाबत आपण लवकरात लवकर विचार करू, असे आश्वासन दिले. वृत्तपत्र क्षेत्राच्या सर्व अडीअडचणींबाबत आयएनएस सातत्याने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठपुरावा करेल, असे आयएनएसच्या महासचिव मेरी पॉल यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्यासमवेत हिंदुस्थानचे विलास मराठे, पुढारीचे योगेश जाधव, राकेश जैन यांच्यासह अनेक वृत्तपत्रांचे संपादक व प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.