For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील समस्या दूर करा

10:49 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवापूर्वी शहरातील समस्या दूर करा
Advertisement

नगरसेवकांची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरूस्ती होणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर समस्याही तातडीने सोडवा. यासाठी विशेष निधीची तरतूद करा, अशी मागणी काही नगरसेवकांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेळगावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील प्रत्येक गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मूर्तीची स्थापना केली जाते. दहा दिवस गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. गणेश विसर्जन मिरवणूकही काढली जाते. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करणे तसेच मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी देखील करण्यात आली. महापौर सविता कांबळे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी बसवन कुडचीचे नगरसेवक बसवराज मोदगेकर, वॉर्ड क्रमांक 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर, सिद्धार्थ भातकांडे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.