महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमित शाह यांच्या कॉलनंतर अर्ज घेतला मागे

05:23 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानच्या झोटवाडा मतदारसंघावरून मोठी चर्चा होत आहे. भाजपचे बंडखोर नेते राजपाल सिंह शेखावत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. परंतु भाजप नेतृत्वाने समजूत काढल्यावर शेखावत यांनी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसला पराभूत करणे आवश्यक असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यावर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निणंय घेतला आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येणे अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे शेखावत यांनी म्हटले.

Advertisement

 राज्यवर्धन यांना उमेदवारी

Advertisement

शेखावत यांच्याऐवजी भाजपने खासदार राज्यवर्धन सिंह राठौड यांना झोटवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. यामुळे शेखावत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती.

वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय शेखावत हे यापूर्वी राज्याचे शहरविकास मंत्री राहिले आहेत. तर काँग्रेसने झोटवाडामध्ये एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अभिषेक चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article