For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सैनिक-दहशतवाद्यांमध्ये पुलवामा येथे चकमक

06:28 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
सैनिक दहशतवाद्यांमध्ये पुलवामा येथे चकमक
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील परिगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. दहशतवादी कारवाया आढळून आल्यानंतर सुरक्षा दलांनी परिगाम परिसरात मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ पाठवत घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहिमेदरम्यान संघर्ष सुरू होता. सदर भागात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाल्यानंतर विशेष मोहीम राबविण्यात आली.

अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. सुरक्षा दलांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. परिसरात जवानांची हालचाल पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत ठार झालेला दहशतवादी ‘टीआरएएस’ या संघटनेशी संबंधित होता.

Advertisement

गेल्या महिन्यात 4 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिह्यातही दहशतवाद्यांनी सर्वसामान्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले होते.

Advertisement
Tags :

.