For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

06:45 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू आणि काश्मीर येथे तैनात असलेले बीकानेरमधील जवान राम स्वरूप कासवान यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. लष्कराच्या ऊग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत जवान राम स्वरूप कासवान हे बिकानेर जिह्यातील नोखा येथील पाचू गावचे रहिवासी होते. राम स्वरूप कासवान यांचा मृत्यू हा शारीरिक अपघात आहे. त्यांच्या डोक्मयात गोळी लागली असून त्यासंबंधी अधिक तपास केला जात असल्याचे जिल्हा लष्करी अधिकारी कर्नल यश राठोड यांनी सांगितले.

राम स्वरूप कासवान हे जुलैपर्यंत लष्करी शस्त्रागारामध्ये तैनात होते. त्यांचा मोठा भाऊ सहिराम हाही लष्करात आहे. लष्कराने त्याचे कुटुंबीय आणि बिकानेर प्रशासनाला माहिती दिली. बुधवारी त्यांचे पार्थिव श्रीनगरहून दिल्लीत पोहोचले. पुढे ते बिकानेरला नेले जाणार आहे. राम स्वरूप कासवान यांचे पार्थिव गुऊवारी सकाळी बिकानेरला पोहोचण्याची शक्मयता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.