मराठा आरक्षणासाठी तारापूर येथील युवकाची आत्महत्या; रात्री आंदोलनात सहभाग, पहाटे संपवले जीवन
आत्महत्येच्या घटनेने मराठा आंदोलक आक्रमक सरकारचा तीव्र शब्दात निषेध
पंढरपूर प्रतिनिधी
सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यामध्ये आंदोलने होत असतानाच पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील विलास क्षीरसागर या माळी समाजाच्या युवकाने अत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता घडल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील युवक विलास कृष्णा क्षीरसागर युवक मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होता. सोमवारी सायंकाळी झालेल्या आंदोलनावेळीही तो त्या ठिकाणी सक्रीय होता. सोमवारी रात्री उशीरपर्यंत तो उपोषणस्थळी होता. परंतु मंगळवारी पहाटे त्याने भगव्या रंगाच्या शेल्याने करंजीच्या झाडाला फास घेवून आपली जीवन यात्रा संपावली.
मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्महत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे. भल्या सकाळी अगदी वाऱ्यासारखी ही घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरल्यानंतर अनेक आंदोलकांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. तर अनेक मराठा आंदोलक तारापूर येथे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी या आंदोलकांकडून विलास क्षीरसागर अमर रहे, यासह मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करीत होते. यामुळे येथील वातावरण भावपूर्ण व आंदोलनमय झाले होते. उशीरपर्यंत प्रशासन अधिकारी आणि आंदोलकांमध्ये चर्चा होऊन विलास क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा
तारापूर येथील विलास क्षीरसागर यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केली आहे. या घटनेस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा. तरच मृतदेह खाली उतरबा, असा आब ->मक पावित्रा घेत मराठा आंदोलकांनी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदनही तहसीलदार यांच्याकडे दिले. प्रशासन अधिकारी आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ चर्चा होत होती. परंतु घटनेस जबाबदार असणाऱ्या सरकारमधील व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर आंदोलक बराच वेळ ठाम राहिले. यामुळे येथील वातावरण तापले होते.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर अंत्यसंस्कार
घटनेस जबाबदार असणाऱ्या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, तरच मृतदेह खाली उतरवा या मागणीवर ठाम असलेल्या मराठा आंदोलकांशी चर्चा करून प्रशासनाकडून अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर क्षीरसागर यांचा मृतदेहावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी सांगितले, गुन्हे दाखल करण्याचे मागणीपत्र, क्षीरसागर कुटुंबास शासकीय मदत, कुटुंबातील एकास शासकीय नोकरी आदींचा प -स्ताव तत्काळ शासनाकडे पाठवून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितल्यानंतर आंदोलकांनी क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ दिले.