सोलापूर रेल्वे स्थानक 'मृत्यूचा प्लॅटफॉर्म'?
सोलापूर :
दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे सोलापूर रेल्वे स्थानक सध्या आत्महत्येच्या घटनांमुळे चर्चेत आले असून, मागील तीन दिवसांत तब्बल तिघांनी धावत्या रेल्वेखाली जीव देत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
या तिघांपैकी केवळ एका व्यक्तीची ओळख पटलेली असून, उर्वरित दोन मृतदेह अद्याप अज्ञात आहेत. या घटनेमुळे स्थानक परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- नागरिकांमध्ये संतापाचे सूर
असे आत्महत्यांचे सत्र सुरू राहिल्यास, सोलापूर रेल्वे स्थानक लवकरच 'मृत्यूचा प्लॅटफॉर्म' म्हणून ओळखले जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि प्रवाश्यांमधून व्यक्त केली जात आहे.
या घटना घडत असताना रेल्वे प्रशासनाची सुरक्षेविषयक निष्काळजीपणा, सीसीटीव्ही यंत्रणांचा परिणामकारक वापर, मनोबल वाढवणाऱ्या उपाययोजना आणि तत्काळ मदत मिळण्याच्या यंत्रणेवरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिस व प्रशासनाकडून तपास सुरू आहेत.