कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur News | रोजगार हमी योजना, गाळयुक्त शिवारातून पूरग्रस्तांच्या शेतात येणार माती : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

04:41 PM Oct 07, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                          जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा पूरग्रस्त भागाला दौरा; शेतकऱ्यांना दिला दिलासा

Advertisement

सोलापुर : अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे तर नुकसान झाले आहेच. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने भविष्यातील शेती कसणे आकानाचे ठरले आहे.

Advertisement

मात्र शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून बाहून गेलेल्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजना, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतात माती टाकण्यात बेईल असे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील डोनमुर्गी येथील पूरबाचित नागरिकांना जिल्हा प्रशासन व अक्षय पात्र या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या २५० फिटचे वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम्, उपविभागीय अधिकारी सुमीत शिंदे, अपर तहसीलदार सुजीत नरहरे, गटविकास अधिकारी शंकर कवीतके, अक्षय पात्र संस्थेचे प्रतिनिधी उपेंद्र नारायण दास, मंडळ अधिकारी राणा वाघमारे, ज्योतिबा पवार, सरपंच सुभाष तेली, ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी होनमुर्गी येथे पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे देखील पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच पुराच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतामधील पिके तर वाहून गेलीच, परंतु मातीही मोठ्या प्रमाणावर वाहून गेलेली आहे. त्यामुळे पुढील काळात शेती करणे अवघड असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

होनमुर्गी येथेही सीना नदीला पूर येऊन अर्धे गाव पुराच्या पाण्यात गेलेले होते. परंतु प्रशासनाने अत्यंत तत्परतेने गावातील लोकांना समजावून सुरक्षित स्थळी घेऊन गेल्याने एकही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाचे कौतुक करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे समाधान व्यक्त केले.

प्रशासनाने पूर परिस्थिती येण्यापूर्वीच गावातील सर्व लोकांना तेरामैल येथे निवारा केंद्रात सुखरूप स्थलांतरित केले होते. या ठिकाणी २४० नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रशासनाच्या वतीने यांना दोन वेळा जेवण पुरवले जात होते. तसेच प्रशासन व सामाजिक संस्थाकडून आलेले सर्व प्रकारची मदत ग्रामस्थांना वाटप करण्यात आलेली आहे.

Advertisement
Tags :
#Maharastra#solapur#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaDistrict Collector Kumar Ashirwad agovernment's schemesolapursolapur news
Next Article