For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | अन्यथा मंत्री, अधिकाऱ्यांना दिवाळी करू देणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा

06:21 PM Oct 06, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news    अन्यथा मंत्री  अधिकाऱ्यांना दिवाळी करू देणार नाही   राजू शेट्टी यांचा इशारा
Advertisement

                                शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपयांची मदत राज्य शासनाने द्यावी : राजू शेट्टी 

Advertisement

सोलापूर : सोलापूरसह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही राज्य शासनाकडून अजूनही मदत जाहीर करण्यात येत नाही. दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपयांची मदत राज्य शासनाने द्यावी अन्यथा मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासह अधिकाऱ्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

पाहणी अतिवृष्टीभागातील करण्यासाठी रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी सायंकाळी सोलापुरातील पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जेष्ठ नेते सिद्रामप्पा अबदुलपूरकर, मोहसिन पटेल, सचिन पाटील उपस्थित होते.

Advertisement

राज्यात सरासरीच्या तुलनेत ११० टक्के पाऊस जास्त झाल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात. पण नुकसान भरपाईबाबत ठोस भूमिका घेत नाहीत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जास्त मदत केली होती. मात्र आता मदत कमी का देण्यात येत आहे असा प्रश्नही केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार पैशांचे सोंग आणता येत नाही, असे सांगतात. जर पैसेच नसतील तर मग सर्व जिल्ह्यातून विरोध होत असलेला शक्तीपीठ रद्द करण्यात यावा. यासाठी तरतूद करण्यात आलेली २० हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी. पीक कर्ज माफ करावे, त्यांना ओला दुष्काळचा लाभदेण्यात यावा, अशीही मागणी केली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनास अनेकदा शेतकरी प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या काही अडचणी असतील. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर राहील. सध्या शेतकऱ्यांच्या

उभारीचा प्रश्न समोर आहे. त्यासाठी भूमिका घेण्यात येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही संधी कशी मिळेल याकडेही पाहिले जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.

केंद्र सरकार पंजाबला घाबरते

पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी केंद्र शासनाने विरोधी सरकार असलेल्या राज्याला मोठी मदत केली. पंजाबमधील शेतकरी थेट संसदेपर्यंत पोचतात. त्यामुळे केंद्र सरकार पंजाबला घाबरते, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

प्रशासनाच्या चुकीमुळे महापूर

भारतीय हवामान खात्याकडून पावसापूर्वी रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र तरीही जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनात योग्य समन्यव झाला नाही. अतिवृष्टीपूर्वी इशारा दिल्यानंतर १८ तासांत नदीतील महापुराचे पाणी अन्य मार्गाने बळविण्याचे नियोजन करता आले असते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आलेला महापूर हा मानवनिर्मित असून याविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.