Solapur Crime : बाहुबली मंदिरातील 8 मूर्तींंची चोरी
आठ मूर्तीसह १ लाख ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास
सोलापूर : विजापूर रस्त्यावरील भगवान बाहुबली जैन मंदिरातील विविध देवतांच्या पंचधातूच्या आठ मूर्तीसह १ लाख ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवार, ४ ते ५ ऑक्टोबरच्या सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत अनिल हिराचंद मणिकशेटे (रा. चक्रवर्ती हौसिंग ) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. मंदिरात पद्मावती तसेच बाहुबली अशा विविध देवतांच्या पंचधातूंच्या मूर्ती होत्या. यातील आठ मूर्ती तसेच दानपेटी फोडून त्यातील १० हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ७३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहायक निरीक्षक विजय गायकवाड करत आहेत.