महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

अक्कलकोटचे प्रभात चित्रपटगृह बंद करण्याचे आदेश

08:33 PM Oct 29, 2022 IST | Abhijeet Khandekar

प्रतिनिधी/अक्कलकोट

Advertisement

अक्कलकोट शहरातील प्रभातचित्र मंदिर परवाना नूतनीकरण नसल्यामुळे बंद करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे.

अक्कलकोट येथील प्रभात चित्रमंदिर परवाना नूतनीकरण नसल्याबाबतची तक्रार दि.१५ मे रोजी संजय इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. प्रभात चित्रमंदिर अक्कलकोटचे परवानाधारक विलासराव विठ्ठलराव इंगळे हे दि. ४ जानेवारी २०२१ रोजी मयत झालेले होते. महाराष्ट्र चित्रपट नियम 1966 मधील नियम 128 मधील तरतुदीनुसार चित्रपटगृहाचे परवानाधारक मयत झाल्याने सदरचे परवाना हे रद्द झाले असल्याचे समजण्यात येईल अशी तरतूद आहे. प्रभात चित्रमंदिर बंद ठेवण्याबाबत दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी आनंद विलास इंगळे यांना कळवण्यात आले होते. परंतु आनंद इंगळे यांना लेखी कळवून ही त्यांनी प्रभात चित्रमंदिर हे चित्रपट ग्रह बंद ठेवले नाही. जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी प्रभात चित्रमंदिर हे चित्रपटगृह बंद करण्याबाबतच्या कारवाई करण्याचे आदेश अक्कलकोटचे तहसीलदार व अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्रद्वारे दिले आहे.

Advertisement
Tags :
#प्रभात चित्रपटगृहअक्कलकोट
Advertisement
Next Article