For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेएमएफसी न्यायालयातील माती-साहित्य हटविले

10:55 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेएमएफसी न्यायालयातील माती साहित्य हटविले
Advertisement

शिस्तबद्धरित्या पार्किंग केल्यास वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटेल

Advertisement

बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्हा कौटुंबीक न्यायालयाची इमारत बांधताना त्याठिकाणी मातीचे ढीग तसेच इतर साहित्य ठेवले होते. ते कंत्राटदाराने हटविलेच नाही. त्यामुळे बुधवारी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनपा कर्मचाऱ्यांनी तेथील मातीचे ढीग व इतर साहित्य हटविले आहे. यामुळे आता काही प्रमाणात पार्किंगची समस्या सुटणार आहे.

दोन वर्षापूर्वी जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात जिल्हा कौटुंबीक न्यायालयासाठी इमारत उभे करण्यात आली. या इमारतीचे काम करण्यासाठी माती, वाळू, विटा, पेव्हर्स यासह इतर साहित्य आणण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतरही ते साहित्य हटविण्यात आले नाही. त्यामुळे चारचाकी वाहने पार्किंग करताना अडचण निर्माण होत होती. परिणामी दररोज या आवारात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील. एस. एस. किवडसन्नावर, जनरल सेव्रेटरी वकील. वाय. के. दिवटे यांनी महानगरपालिकेला संपर्क साधून ते साहित्य हटविण्याची मागणी केली.

Advertisement

बुधवारी सकाळी महानगरपालिकेतर्फे जेसीबी तसेच टिप्पर पाठविण्यात आला. त्यानंतर जेएमएफसी आवारातील सर्व मातीचे ढीग आणि इतर साहित्य हटविण्यात आले आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. यावेळी उपाध्यक्ष वकील. शितल रामशेट्टी, उपाध्यक्ष वकील. विजयकुमार पाटील, वकील. व्ही. टी. सोनवालकर, वकील. सचिन मगदूम आदी उपस्थित होते.

वकील-पक्षकारांनी वाहने व्यवस्थित पार्किंग करणे गरजेचे

बेळगाव बार असोसिएशनने येथील साहित्य हटविले आहे. त्यामुळे कौटुंबीक न्यायालयासमोर असलेल्या खुल्या जागेमध्ये शिस्तबद्धरित्या वकील व पक्षकारांनी आपली चारचाकी वाहने पार्किंग करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वकिलांनीच प्रथम शिस्तबद्धरित्या पार्किंग केल्यास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. तेव्हा आता याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.

Advertisement
Tags :

.