कोल्हापुरातून सॉफ्टवेअरची निर्यात? पण आयटी पार्कचा अभाव!
कोल्हापूर :
कोल्हापुरात आयटी पार्क वा आयटी हब उभा करणार असल्याची घोषणा होत आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातून सॉफ्टवेअरची निर्यात 50 टक्क्यांनी वाढ होऊन, पाच वर्षांत 128 वरून 189 कोटीवर निर्यांत झाली असल्याची माहिती तंत्रज्ञानमंत्री यांनी लोकसभेत दिली आहे. याबाबत स्थानिक आयटी तज्ञांमधून अनभिज्ञतेबरोबर साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
कोल्हापूरच्या सॉफ्टवेअर निर्यातीविषयी दिवसभर चर्चां सुरू आहे. कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती काय आहे ? जेथे आयटी पार्क वा आयटी हब उभा राहू शकत नाही, तेथे या सॉफ्टवेअरची निर्यात कशी, कोणामार्फत, कधी करण्यात आली. याबाबत स्थानिक आयटी तज्ञ बुचकळयात पडले आहेत. या निर्यातीचा आकडा म्हणजे, शासनाचा टॅक्स की टर्नओव्हर? याबाबतचे चित्र यापूर्वी कधी ही स्पष्ट झालेले नाही, असे असताना या निर्यातीबाबत स्थानिक आयटी क्षेत्रामधून उलट-सुलट चर्चां सुरू आहे.
कोल्हापुरातील आयटी इंजिनियरंना चांगला रोजगार मिळावा यासाठी ते बाहेर जाऊ लागले आहेत. कोल्हापुरात इंजिनियरिंग कॉलेजीस संख्या अधिक असून, दरवर्षी अंदाजे 15 हजार विद्यार्थी इंजिनियर म्हणून बाहेर पडत आहेत. येथे आयटी पार्क व मोठा उद्योग नसल्याने, स्थानिक युवा इंजिनियर नोकरीसाठी बाहेर जात आहेत. विशेषत: आयटी क्षेत्रामध्ये कोल्हापुरातील अंदाजे लाखभर कुशल इंजिनियर मोठ्या शहरात व परराज्यात गेले आहेत. कोल्हापुरातील कमी पगार, आयटी पार्कचा अभाव, यामुळे अनेक कुटुंबे मुलापासून दूर झाले आहेत. पुणे, मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, गुजरात, दिल्ली, नोएडा आदी शहरामध्ये ते युवक-युवती काम करत आहेत.
शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) काही वर्षांपुर्वी आयटी पार्पं उभा केला होता. सद्यस्थितीत हा आयटी पार्क खाजगी कंपनीकडे आहे. टेंबलाईवाडी येथे आयटी पार्क उभा करण्याची घोषणा झाली होती. पण राजकीय वातावरणामुळे इथला आयटी पार्क अजूनही उभारलेला नाही. आता सर्व नेत्dयांची नजर आयटी पार्कसाठी शेंडापार्क येथील कृषि विभागाच्या जागेवर आहे. कोल्हापुरात किमान आयटी पार्क तरी उभा रहावा अशी मागणी होत आहे.