For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन वर्षातील संकल्प : से नो टू एपीके फाइल

01:00 PM Jan 01, 2025 IST | Radhika Patil
नवीन वर्षातील संकल्प   से नो टू एपीके फाइल
New Year's Resolution : Say No to APK File
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

मागील महिन्यात सायबर गुन्हेगारांनी पाठवलेल्या पीएम किसान योजनेची माहितीच्या नावाखाली एपीके फाइल्स डाऊनलोड केल्याने लाखो रुपयांची फसवणूक शेतकरी वर्गाची झाली. तर लग्नाच्या आमंत्रणाचे ई-कार्ड मोबाईल क्रमांकावर मेसेजच्या माध्यमातून पाठवून शिक्षित वर्गाची बँक खाती सायबर गुन्हेगारांनी रिकामी केली. नव्या वर्षात एपीके लिहीलेली कोणतीही फाईल असो अथवा ज्यासंबंधी माहिती नाही, अशी कोणतीही अनोळखी व्यक्ती अथवा वेबसाईटला भेट देणारच नाही, असा संकल्प नव्या वर्षासाठी करण्याची गरज आहे. तर आणि तरच बँक खात्यावरील कष्टाचे पैसे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागणार नाहीत याशिवाय आपल्या खासगी आयुष्यातील माहितीही सुरक्षित राहील.

विविध प्रकारची देणी, लाईट, पाणी बिल, मोबाईलचे बिल, विविध शासकीय योजनांचे पैसे परतावा मिळवण्यासाठी तसेच माहितीसह निमंत्रण देण्यासाठी, शुभेच्छा देणारे मेसेज आदींचा वापर सायबर गुन्हेगार करत आहेत. डॉट एपीके असलेली फाईल किंवा लिंक मोबाईलवर पाठवून फसवण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. यामध्ये ई-कार्डद्वारे एक लिंक पाठवली जाते. त्यात एक लिंक असते. त्या लिंकवर क्लिक केली की .aज्क् (डॉट एपीके) फाईल डाऊनलोड होते. या फाईलच्या माध्यमातून एखादा व्हायरल किंवा सॉफ्टवेअर हे गुन्हेगार तुमच्या मोबाईलमध्ये पाठवत असतात. ही लिंक क्लिक करून फाईल डाऊनलोड होताच अनेकदा तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबाच संबंधित गुन्हेगाराला मिळत असतो.

Advertisement

त्यानंतर हे गुन्हेगार हवं ते करू शकतात. नाना विविध कारणे सांगून सायबर गुन्हेगार ही फाईल किंवा लिंक मोबाईलवर पाठवतात. अशाप्रकारे एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर अनेकदा तुमच्या संपूर्ण फोनचा ताबा फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांकडे जात असतो. अशावेळी ते तुमच्याबरोबर काहीही करू शकतात. मोबाईलचा ताबा गुन्हेगाराकडे जातो तेव्हा तुमचे बँक डिटेल्स, फोन पे, गुगल पे यासारख्या अॅपचे पासवर्डही गुन्हेगाराला मिळू शकतात. तसेच बँकेकडून येणाऱ्या ओटीपीचा अॅक्सेससुद्धा गुन्हेगाराला मिळू शकतो. या सर्वाचा वापर करून आपण अनेकदा पाहतो, ऐकतो तशी तुमची आर्थिक फसवणूक केली जाण्याची शक्यता असते. याशिवाय आणखी एक धोका असतो तो म्हणजे, मोबाईलमधील फोटो-व्हिडीओ अशा प्रकारचा डेटा वापरून ब्लॅकमेलिंग केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक वापरून इतरांकडे पैशांची मागणीही केली जाऊ शकते. नव्या वर्षात सायबर गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी फेक कॉल्स आणि फेक मेसेजपासून सावध राहण्याचा संकल्प करु या.

                                                    कोणती काळजी घ्याल

अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी मोबाईल वापरणाऱ्यांनी सजग राहण्याची गरज आहे. ओळखीच्या क्रमांकावरून असे ई-कार्ड किंवा लिंक आली तर त्याबाबत तुम्हाला फार विचार करावा लागत नाही. मात्र, अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही लिंक किंवा मेसेजबाबत शंका घेणं गरजेचे आहे. कसली निमंत्रण किंवा शुभेच्छा देणारा अथवा माहिती देणारा मेसेज किंवा ती फाईल जेपीजी किंवा पीडीएफ अशी फोटोच्या स्वरुपात असेल. किंवा व्हिडीओ असू शकतो. पण लिंकची गरज काय, हा एकदा विचार करायला हवा. त्याचबरोबर या लिंकवर क्लिक केल्यावर थेट फाईल डाऊनलोड होत नाही. ब्राऊजर तुम्हाला अलर्ट देते. त्यामुळे असा अलर्ट आला तर लगेच सावध व्हावे आणि अशी फाईल डाऊनलोड करू नये. याबाबत सर्वच बँकांनी आपल्या खातेदारांना मेसेज पाठवून एपीके फाईल्सबाबत सजग राहण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement
Tags :

.