For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमलनाथ यांच्याकडून ‘सॉफ्ट हिंदुत्व’

05:14 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
कमलनाथ यांच्याकडून ‘सॉफ्ट हिंदुत्व’
Advertisement

श्रीलंकेत मंदिर उभारण्याची दिली गॅरंटी

Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हे सॉफ्ट हिंदुत्वाचे धोरण स्वीकारून भाजपवर मात करू पाहत आहेत. याचमुळे त्यांनी केवळ मध्यप्रदेशात नव्हे तर श्रीलंकेतही मंदिर उभारण्याची घोषणा केली आहे. श्रद्धा आणि विश्वासासोबत समृद्ध मध्यप्रदेशची निर्मिती व्हावी हाच माझा संकल्प आहे. हा संकल्प साकार करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. भाजपची हिंदुत्ववादी प्रतिमा पाहता कमलनाथ यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला आहे. भाजप सनातन, अयोध्येतील राम मंदिर, उज्जैनचे महाकाल आणि ओंकारेश्वर येथील आदि शंकराचार्य लोकच्या नावावर मतदारांना आकर्षित करू पाहत आहे. तर मध्यप्रदेशात काँग्रेस देखील सॉफ्ट हिंदुत्वानुसार पावले उचलत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस सत्तेवर येताच श्रीलंकेत सीतामातेचे मंदिर उभारण्यात येणार असल्याचे म्हणत कमलनाथ यांनी 11 गॅरंटी जाहीर केल्या आहेत.

नर्मदामातेशी निगडित प्रकल्पांसाठी कमलनाथ यांनी गॅरंटी दिली आहे. मध्यप्रदेशवासीयांसोबत माझी माता नर्मदेवर मोठी आस्था आहे. माता नर्मदेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी मी वचनबद्ध आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास मा नर्मदा परिक्रमा परिषद स्थापन करुन परिक्रमावासीयांना सुविधा पुरविल्या जातील. तसेच नर्मदा संरक्षण  अधिनियम आणला जाईल असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

Advertisement

कमलनाथ यांच्या 11 गॅरंटी

?‘श्री राम वन गमन पथ’ आणि ‘सीता माता मंदिर श्रीलंका’चा प्रकल्प लवकर पूर्ण करणार

?‘मां नर्मदा परिक्रमा परिषद’ स्थापन करून परिक्रमावासियांना सुविधा पुरविणार, नर्मदा परिक्रमा सेवकांना ओळखपत्र देणार

?नर्मदा परिक्रमा पथावर सर्वसुविधांनी युक्त 51 नर्मदा भवन, नर्मदा कॉरिडॉर, नर्मदा रिव्हरफ्रंट बायोडायव्हसिटी पार्क निर्माण करणार, नर्मदा घाटांचा विकास करणार

?भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ जानापावला पवित्र स्थळ घोषित करणार

?‘श्रवण कुमार मातृ-पितृ भक्ती योजना’ सुरू करत अस्थी विसर्जन आणि अंत्यसंस्कार सहाय्यासाठी 10 हजार रुपयांची मदत देणार

?तीर्थस्थळांमधील पुजाऱ्यांसाठीचा पुजारी सन्मान निधी वाढवून देणार

?सर्व पंथांच्या पुजाऱ्यांना कुटुंबीयांसमवेत

25 लाखापर्यंतचा वरदान आरोग्य विमा सुरक्षा पुरविणार

?गुरुजनांच्या आराधनेसाठी ‘सर्व गुरु धाम प्रार्थना स्थळ’ निर्माण करणार

?जैन, बौद्ध, शीख समाजाची तीर्थस्थळे आणि मुनिराजांची सुरक्षा, संरक्षण सुनिश्चित करणार, प्रत्येकासाठी महामंडळ स्थापन करणार

?संत रविदास पीठ, मुरैना आणि संत कबीरदास पीठ रीवामध्ये स्थापन करणार

?सिंधू तीर्थस्थळासाठी ‘भगवान झूलेलाल ट्रस्ट’ची स्थापना करून  त्याकरता आर्थिक सहकार्य  करण्यात येणार

Advertisement
Tags :

.