For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाजकल्याण अधिकारी घोळवेंना लाखाच्या लाचेसह रंगेहाथ पकडले

02:02 PM Jun 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
समाजकल्याण अधिकारी घोळवेंना लाखाच्या लाचेसह रंगेहाथ पकडले
Sapna Gholve
Advertisement

साताऱ्यातील महिला अधिकारी, निरीक्षकही अटकेत
सांगली प्रतिनिधी 
जिह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे सहा लाखांची मागणी कऊन एक लाखाची लाच स्वीकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे (वय 40) या वर्ग एकच्या अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले. त्यात आपलेही १० हजार वरकड मागणाऱ्या सांगलीतील निरीक्षक दीपक भगवान पाटील लाही अटक झाली आहे.

Advertisement

घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता 59 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. तो धनादेश देण्यासाठी १० टक्के हवेत असा सहाय्यक संचालक सपना घोळवे हिचा आग्रह होता. त्यामुळे संस्थेच्यावतीने कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. चर्चेअंती एक लाख ऊपये देण्याचे ठरले. लाचलुचपत विभागाने बुधवारी समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवे हीने एक लाख रूपये घेवून येण्यास सांगितले. तर समाज कल्याण निरीक्षक दिपक पाटील याने तो धनादेश लिहिण्यासाठी 10 हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाखाची लाच घोळवे हिने स्वत: स्वीकारताना तिला रंगेहात पकडले. तर लाचेची मागणी करणाऱ्या निरीक्षक दिपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

मी पुन्हा इथेच येणार आहे....लाचखोर महिलेची धमकावणी
दरम्यान पोलिसांनी पकडून गाडीत बसवले जात असतानाही लाचखोर महिला अधिकारी तोऱ्यात होती. मी पुन्हा इथेच अधिकारी म्हणून येणार आहे अशी धमकावणी तिने जाता जाता देण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे या महिलेविरूध्द अनेक तक्रारी दाखल झाल्या असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान गेल्या काही दिवसात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई थंड पडली होती. मात्र अचानक वर्ग एकची एक महिला आणि निरीक्षक पकडला गेला. सरकारी कामात लाच मागणाऱ्यांना पकडण्यासाठी लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.