For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

Satara News: साताऱ्यातील पुसेसावळीत दोन गटातं राडा,15 जण जखमी, दोघांचा मृत्यू

07:23 PM Sep 11, 2023 IST | Abhijeet Khandekar
satara news  साताऱ्यातील पुसेसावळीत दोन गटातं राडा 15 जण जखमी  दोघांचा मृत्यू

Satara News : समाजमाध्यमांवर महापुरुषांची बदनामी करणारे स्टेटस ठेवल्याच्या घटनेचे खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले आहेत. याठिकाणी दोन गटात जोरदार राडा झाला. प्रार्थना स्थळावर दगडफेक करत हल्ला केला यात एक तरूण गंभीर जखमी झाला. यावेळी हाणामारीत आणखी 15 जण जखमी झाले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. आज सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून,जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

नेमके काय घडले
पुसेसावळी येथे समाजमाध्यमवर महापुरुषांची बदनामी करणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले.या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे,दुकाने,हातगाडे,वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली.यावेळी त्याच परिसरात असणाऱ्या प्रार्थनास्थळाकडे हा जमाव सरकत मारहाण सुरु केली. या मारहाणीत एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर हाणामारीत 15 जण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. पुसेसावळीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.