For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक वनीकरण लावणार दीड लाख रोपे

06:21 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सामाजिक वनीकरण लावणार दीड लाख रोपे
Advertisement

हिरवळ वाढणार, खड्डे काढण्याचे काम सुरू

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

पर्यावरण प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत यंदाच्या हंगामात विविध प्रजातीची 1.67 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नरेगा योजनेंतर्गत ख•s काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच रोप लागवडीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणार असल्याने सर्वत्र हिरवळ वाढणार आहे.

Advertisement

सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, नरेगा यांच्या सहकार्याने पाच वर्षांत 1 कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या मान्सून हंगामात दीड लाख रोप लागवड होणार आहे. विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी खाते, बागायत खाते, मोकळ्या जागा, गायरान, सरकारी शाळा, एपीएमसी, मार्केट आदी ठिकाणी ही लागवड होणार आहे. याबाबतची सर्व तयारी सामाजिक वनीकरण विभागाने केली आहे.

गतवर्षी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुपनलिकांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत लागवड करण्यात आलेल्या रोपांना पाणी देणे शक्य होवू लागले आहे. गतवर्षी 1 लाखांहून अधिक कुपनलिकांची खोदाई झाली आहे. त्यामुळे रोपांना पाणी मिळणे सोयीस्कर होवू लागले आहे. आतापर्यंत लागवड करण्यात आलेल्या 2 लाख 20 हजार रोपांचे संवर्धन होवू लागले आहे.

विशेषत: रोपांमध्ये आंबा, चिंच, चिक्कू, कडीपत्ता, डांळींब, वड, पिंपळ आदींचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यात 50 लाखांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र यंदाच्या दुष्काळामुळे रोपांच्या लागवडीवर त्याचा परिणाम झाला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे हवामानानुसार रोप लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे.

के. एस. गोरवार-उपसंवरक्षण अधिकारी-सामाजिक वनीकरण

यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस चांगला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात रोप लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. रोप वाटीकांमध्ये 1 लाख 67 हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. शिवाय खड्डे काढण्याचे कामही सुरू आहे. लवकरच ही लागवड केली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात विविध प्रजातींची रोपे दिली जात आहेत.

Advertisement
Tags :

.