शोभिता धुलिपालाला मोठा ‘रोल’
शोभिता धुलिपालाने अनेक हिंदी, तेलगू, मल्याळी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता शोभिता आणखी एका तमिळ चित्रपटात काम करणार असून यात तिच्यासोबत अनेक अभिनेते दिसून येणार आहेत. शोभिता आता प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक पा. रंजीत यांच्या नव्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात दिनेश मुख्य अभिनेता असेल तर आर्या खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, परंतु यात अशोक सेल्वन आणि फहाद फासिल यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील.
शोभिता एक भारतीय सुपरमॉडेल, माजी मिस अर्थ इंडिया आणि अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मल्याळी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोभिताने मॉडेलिंगद्वारे स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. 2013 मध्ये तिने मिस इंडिया अर्थचा पुरस्कार पटकाविला होता. शोभिताने 2016 मध्ये बॉलिवूड चित्रपट ‘रमन राघव 2.0’मध्ये अभिनय केला होता. शोभिताने दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यसोबत विवाह केला आहे.