Solapur : सोलापुरात पार्क स्टेडियम गेटसमोर एकावर जीवघेणा हल्ला
11:58 AM Nov 03, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
सोलापूर प्रतिनिधी
येथील पार्क स्टेडियम गेट (हॉटेल सावजी) जवळ गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास अज्ञाताने एकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर जखमी झालेला गृहस्थ बेशुद्ध पडल्यावर हल्ला करणारा घटनास्थळावरून पसार झाला. जखमीवर शासकीय रुग्णायातील अतिदक्षता विभागात उपचारास दाखल करण्यात आले, असून तो बेशुध्द अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Advertisement
जखमीचे नाव राजू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला हे उघड झाले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. हल्ला करणार्यास लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले. सकाळी फिरण्यास येणा-या नागरिकांची या भागात मोठी वर्दळ असते.
Advertisement
Advertisement