For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur : पंढरपूरमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीती

05:26 PM Nov 27, 2025 IST | NEETA POTDAR
pandharpur   पंढरपूरमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट  नागरिकांमध्ये भीती
Advertisement

                         पंढरपूर तालुक्यातील चोरट्यांचा वाढता सुळसुळाट

Advertisement

पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट बाढला आहे. महागड्या मोटारसायकल आणि दुकाने, बँका, पतसंस्था यांना लक्ष्य केले जात आहे. मागील तीन दिवसांत पंढरपूर शहरातून तीन दुचाकी वाहने चोरीला गेली तर तालुक्यातील तुंगत येथे छोटे किराणा दुकान फोडून गल्ल्यातील किरकोळ रक्कम चोरली.

यानंतर गावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र शटर मजबूत असल्याने प्रयत्न अयशस्वी झाला. या चोरट्यांनी किराणा खोक्यातील बरणी चोरली. त्यातील बर्फी खात खात एका युवकाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने गाडी सुरू झाली नाही.

Advertisement

एवढ्यात घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले. या गडबडीत एका चोरट्याचा टॉवेल पडला. विशेष म्हणजे हे चोरटे चारचाकी वाहनातून आले होते. पुढे जाऊन मोबाईलवर कॉल करताच एक गाडी आली आणि चार चोरट्यांना घेऊन पसार झाली आहे. वाड्या बस्तीबर लोक सुरक्षित नसून कासेगाव, गोपाळपुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.