महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

.तर मी करेन मोदींचा प्रचार

06:29 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अरविंद केजरीवालांचे वक्तव्य : छत्रसाल स्टेडियममध्ये जनता अदालत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियममध्ये आयोजित जाहीरसभेत भाजपवर टीका करत दिल्लीत भाजपची कार्यप्रणाली आणि केंद्र सरकारबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डबल इंजिन सरकारचा अर्थ डबल लूट आहे. मागील 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार असूनही फेल असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

पुढील एक वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होणार आहेत. अशा स्थितीत त्यांनी किमान काही तरी काम करून दाखवावे. जर 22 राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी वीज मोफत केली तर मी स्वत: मोदींसाठी प्रचार करणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे डबल इंजिन सरकार समाप्त होणार आहे. झारखंड आणि महाराष्ट्रातही हेच घडणार आहे. डबल इंजिन सरकारचा अर्थ महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार असल्याचे लोक ओळखून आहेत. दिल्लीत लवकरच निवडणूक होणार आहे. दिल्लीत भाजप डबल इंजिनचे सरकार आणावे असे लोकांना सांगेल. तेव्हा भाजपच्या नेत्यांना हरियाणाचे उदाहरण द्यावे असे केजरीवालांनी सभेत उपस्थित समुदायाला उद्देशून म्हटले आहे.

उत्तरप्रदेशात मागील 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत  उत्तरप्रदेशात भाजपला निम्म्या जागा गमवाव्या लागल्या. मणिपूरमध्येही 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. मणिपूर दोन वर्षांपासून हिंसेला तोंड देत आहे. दिल्लीची सुरक्षा भाजपच्या नियंत्रणात आहे, पोलीस त्यांच्या नियंत्रणात ओत. तरीही दिल्लीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सुरक्षेची ही जबाबदारी सांभाळता येत नसेल तर दुसऱ्यांना काम करू दिले जावे असे  केजरीवालांनी म्हटले आहे.

एका महिलेला दिल्लीत बसमधून प्रवास करताना कुठल्या त्रासाला सामोरे जावे लागते याची मला कल्पना आहे. याचमुळे आम्ही बसेसमध्ये मार्शल तैनात करण्यास सुरुवात केली. या बस मार्शल्सनी अनेक मोठ्या गुन्ह्यांना रोखले  आहे. अनेक मुलांचे अपहरणही यामुळे टळले असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

भाजप हा गरीबविरोधी पक्ष आहे. 10 हजार बस मार्शल्स हे गरीब परिवारातून नियुक्त करण्यात आले होते. त्यांना 15 हजार रुपये वेतन दिले जात होते, त्यांची नोकरी हिरावून घेण्यात आली. भाजपचे लोक गरीबांच्या विरोधात काम करत आहेत. भजपने गरीबांसाठी काम करणाऱ्या अनेक लोकांची नोकरीच काढून घेतल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article