आतापर्यंत 4 कोटींहून अधिक आयटीआर दाखल
66 टक्के लोकांनी नवीन आयकर प्रणालीची केली निवड : 31 जुलैपर्यंत संधी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही अद्याप तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरला नसेल, तर 31 जुलै 2024 पूर्वी दाखल करण्याची संधी आहे, अशी माहिती सेंट्रल डायरेक्ट बोर्डाचे अध्यक्ष रवी अग्रवाल (सेंट्रल डायरेक्ट बोर्ड चेअरमन रवी अग्रवाल) यांनी दिली आहे. ते म्हणाले की, रिटर्न भरणाऱ्या 66 टक्के करदात्यांनी नवीन आयकर प्रणालीचा पर्याय निवडला आहे. सेंट्रल डायरेक्ट बोर्डाचे अध्यक्ष रवी अग्रवाल म्हणाले की, अजूनही अनेकांनी आयटीआर भरलेला नाही. आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रत्यक्ष कर विभाग आणि सरकार आयकर विभागासोबत एकत्ररित्या काम करत आहे. ज्यांनी आयकर रिटर्न भरले नाही ते 31 जुलैपर्यंत दंड न भरता रिटर्न भरू शकतात. आतापर्यंत गेल्या वर्षी भरलेले अधिक रिटर्न दाखल झाले आहेत. सेंट्रल डायरेक्ट बोर्डाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी सांगितले की, आयटीआर फाइल करण्याची प्रक्रिया जितकी सोपी असेल तितके लोक सहज रिटर्न भरू शकतील, अशी योजना आखली गेलेली आहे.
यंदा रिटर्न फाइल्स अधिक
गेल्या वर्षी 25 जुलै रोजी प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा ओलांडला. मात्र यावेळी 22 जुलै रोजीच संख्या गाठली आहे. भविष्यात अधिकाधिक लोक नवीन करप्रणालीचा अवलंब करतील, असेही बोलले जात आहे.