कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्पाने उतरविला बुलेट ट्रेनचा माज

06:44 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगातील प्रत्येक देश त्याच्या काही वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. ही वैशिष्ट्यो नैसर्गिक असतात तशीच मानवनिर्मितही असतात. जपान हा देश त्याच्या भन्नाट वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन्ससाठी प्रसिद्ध आहे. बुलेट ट्रेन ही जपानच्या तंत्रवैज्ञानिक प्रगतीचा एक मानदंड मानला जातो. त्यामुळे, प्रत्येक जपानी नागरीकाला आपल्या देशातील अशा बुलेट ट्रेनसंबंधी गर्व असणे स्वाभाविकच आहे.

Advertisement

पण, काहीवेळा क्षुल्लक समजल्या जाणाऱ्या घटना किंवा जीवजंतू या गर्वाचा पारा खाली आणतात, असा अनुभव येतो. मानवाने कितीही तांत्रिक प्रगती केली तरी कित्येकदा त्याला निसर्गासमोर हात टेकावे लागतात. बुलेट ट्रेन्सची ख्याती अशी आहे की त्या वेळेच्या संबंधात अत्यंत अचूक असतात. काही सेकंदांचाही उशीर त्यांना होत नाही. पण एका प्रसंगाने त्यांच्या या गर्वाचा पारा उतरविला आहे.

Advertisement

घडलेली घटना अशी की, टोकियोहून ओसाका येथे जाणाऱ्या एका बुलेट ट्रेनमध्ये एक अनोखी प्रकार नुकताच घडला. एक लांबलचक सर्प या ट्रेनच्या इलेक्ट्रिन लाईनवर जाऊन चिकटला. त्यामुळे त्याला तेथून काढेपर्यंत, संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत त्या मार्गावरच्या सर्व बुलेट ट्रेन्स बंद ठेवाव्या लागल्या. तो आठवडा जपानमध्ये सुटीचा होता. त्यामुळे स्थानिक बुलेट ट्रेन्समध्ये प्रचंड गर्दी होती. कारण सुटीच्या काळात प्रवास करायचा ही जपानी नागरीकांची सवय आहे. मात्र, स्थानिक रेल्वेसेवा वेळेच्या संबंधात तत्पर असल्याने लोकांना विलंबाची सवय नाही. पण एका सापामुळे अनेक बुलेट ट्रेन्स काही तास उशीरा धावल्याने लोकांना रेल्वे स्थानकांवरच बरेच तास प्रतीक्षा करावी लागली. भारतात लोकांना याची सवय असते. पण जपानी लोकांना तशी ती नसल्याचे या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली, जपान सरकारने आता चौकशी घोषित केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article