महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ढोलगरवाडीत आज सापांचे चित्रप्रदर्शन

10:49 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सापांचे प्रत्यक्ष दर्शन नाही : शासनाच्या नियमांचे पालन

Advertisement

बेळगाव : नागपंचमीनिमित्त शुक्रवार दि. 9 रोजी ढोलगरवाडी, ता. चंदगड येथे सापांचे प्रत्यक्ष दर्शन दिले जाणार नाही. केवळ चित्रप्रदर्शन, बॅनर आणि चित्र मॉडेल व प्रोजेक्टरद्वारे सापांची माहिती दिली जाणार आहे. कोणतेही जिवंत साप दाखविले जाणार नाहीत, याची सर्पप्रेमींनी नोंद घ्यावी, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी केले आहे. ढोलगरवाडी येथील शाळेमध्ये मागील 58 वर्षांपासून पर्यावरण संवर्धन आणि लोकजागृतीसाठी सापांची शास्त्राrय माहिती दिली जाते. यामध्ये विषारी, बिनविषारी, सर्पदंश, प्रथमोपचार, अंधश्रद्धा, गैरसमज याबाबत जागृती केली जात आहे. मात्र, गतवर्षीपासून वनखाते आणि शासनाच्या नियमांचे पालन करत प्रत्यक्ष साप दाखविले जाणार नाहीत. केवळ सापांची माहिती दिली जाणार आहे. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ ही माहिती देणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article