Sangli News : स्मृती मानधना 23 नोव्हेंबरला होणार विवाहबद्ध; सांगलीत लग्नसोहळ्याची धूम!
क्रिकेट स्टार स्मृती मानधनाच्या लग्नाला सांगली सज्ज
सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा येत्या २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत पार पडणार आहे. ती प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत विवाहबद्ध होत असून या सोहळ्याला क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती सांगलीत लाभणार आहे. जावई पलाश मुच्छल याचे गुरुवारी कुटुंबाकडून जोशपूर्ण स्वागत झाले.
इंदूरमध्ये मुच्छल कुटुंबीयांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि संगीत कार्यक्रमांनी लग्नघर सजले आहे. जावई पलाश मुच्छल याचे कुटुंबाकडून जोशपूर्ण स्वागतमीडियावर स्मृतीने एंगेजमेंट रिंग दाखवून अधिकृत घोषणा केली होती. स्मृतीच्या सहकरी जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी यांनी नृत्य व आनंदसोहळ्यात भाग घेतला. सोशल सांगलीत स्मृतीचे मूळ गाव असल्याने कुटुंबिय मित्र आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
शहरात परिवाराशी संबंधित ठिकाणी सजावट, ढोल-ताशे आणि पारंपरिक व आधुनिक संगीताचा संगम पाहायला मिळत आहे. इफोरिया गृहप्रकल्प जिथे स्मृतीचा परिवार रहातो तिथे विद्युत रोषणाई केली आहे. या विवाह सोहळ्याला क्रिकेट आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्वे उपस्थित राहणार