महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मृती इराणी वडिलांसोबत पंतप्रधान मोदींच्या भेटीला

06:51 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या वडिलांसोबत गुऊवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सदर छायाचित्र व्हायरल होत आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन स्वरुपात लिहिलेला मजकूर मनोरंजक आहे. स्मृती इराणी यांनी या बैठकीची तुलना शाळेत झालेल्या पालक-शिक्षक बैठकीशी (पीटीएम) केल्याने या फोटोची रंजकता वाढली आहे.

Advertisement

फोटोमध्ये स्मृती इराणी आपले वडील अजय कुमार मल्होत्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसलेल्या दिसत आहेत. या चित्रासोबत ‘जेव्हा बॉस वडिलांना भेटतो आणि तुम्ही प्रार्थना करता की त्यांनी तुमच्याबद्दल एकमेकांची तक्रार करू नये. पेटीएम चालू आहे’ असा मजकूर विनोदी पद्धतीने लिहिला आहे. या फोटोवर एकामागून एक मजेशीर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. तसेच काही लोकांनी इराणी यांची खूप प्रशंसा केली. टेलिव्हिजन निर्मात्या एकता कपूर यांनी स्मृती इराणींच्या वडिलांच्या लूकचे कौतुक केले. याशिवाय अभिनेता सोनू सूदने ‘आदर्श विद्यार्थ्याचे खूप कौतुक’ अशी टिप्पणी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article