महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मृती, हरमनप्रीतची शतके, मालिकेत भारताची विजयी आघाडी

06:27 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाची आफ्रिकेवर मात :

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

चिन्नास्वामी स्टेडियमवर रोमांचक ठरलेल्या हाय स्कोअरिंग दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकन संघावर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रारंभी, सलामी फलंदाज स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने 50 षटकांत 3 बाद 325 धावा केल्या. स्मृतीने 120 चेंडूमध्ये 136 धावांचा पाऊस पाडला. हरमनप्रीतने 88 चेंडूत नाबाद 103 धावा ठोकल्या. यानंतर आफ्रिकन संघाला 50 षटकांत 6 बाद 321 धावा करता आल्या. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 23 रोजी बेंगळूर येथे होईल.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवात केली. शेफाली वर्मा 20 धावांवर बाद झाली. यानंतर हेमलताही फारसा प्रभाव दाखवता आला नाही. 24 धावांवर तिला मसाबाटाने तिला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने स्मृतीला शानदार साथ दिली. या दोघांनी आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हरमनप्रीत आणि स्मृती यांनी तिसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीमध्ये पोहचवले. भारतीय संघ सुस्थितीत पोहचला तेव्हा स्मृती बाद झाली. तिने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावताना 120 चेंडूमध्ये 136 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये स्मृतीने 18 चौकार आणि दोन षटकार ठोकले.

स्मृती बाद झाल्यानंतर अखेरच्या पाच षटकात हरमनप्रीतने तुफान फटकेबाजी केली. हरमनप्रीतने रिचा घोषच्या साथीने धावांची गती वाढवली. अखेरच्या चार षटकांमध्ये 55 धावा जोडल्या. यादरम्यान, कर्णधार हरमनप्रीतने आपले शतकही पूर्ण केले. तिने 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 88 चेंडूमध्ये नाबाद 103 धावांचे योगदान दिले. रिचा घोषने 13 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. स्मृती व हरमनप्रीत या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने 3 बाद 325 धावांचा डोंगर उभा केला.

सलग दुसऱ्या सामन्यात आफ्रिका पराभूत

भारताने विजयासाठी दिलेल्या 326 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकन महिला संघाची सुरुवात खराब झाली. आफ्रिकेने 67 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. पण कर्णधार लॉरा वॉलवर्ट व मरिजेन केप यांनी चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. ही जोडी मैदानात असेपर्यंत आफ्रिका सामना जिंकेल असे वाटत होते पण केपला दीप्ती शर्माने बाद करत ही जोडी फोडली. केपने 94 चेंडूत 114 धावा केल्या. यानंतर कर्णधार वालवर्टने 135 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारासह नाबाद 135 धावा करत शेवटपर्यंत झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. आफ्रिकन संघाला 50 षटकांत 6 बाद 321 धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 3 बाद 325 (स्मृती मानधना 120 चेंडूत 136, शेफाली वर्मा 20, हेमलता 24, हरमनप्रीत 88 चेंडूत नाबाद 103, रिचा नाबाद 25, मलाबा 2 बळी).

द.आफ्रिका 50 षटकांत 6 बाद (लॉरा वुलवार्ट, नाबाद 135, तजमिन ब्रिटस 5, अॅनी बोच 18, मेरिझेन कॅप 114, डी क्लर्क 28, शॅगसे 0,  पूजा वस्त्रकर व दीप्ती शर्मा प्रत्येकी दोन बळी).

स्मृतीची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही स्मृती मानधनाने शतक झळकावले. स्मृतीचे वनडे कारकिर्दीतील सातवे शतक आहे. मागील सामन्यातही मानधनाने शानदार शतक झळकावले होते. या शतकासह तिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. सलग दोन वनडे सामन्यात शतके झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याशिवाय, तिने वनडे क्रिकेटमध्ये भारताची माजी कर्णधार मिताली राजच्या सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. वनडेमध्ये 7 शतके झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय सलामीवीर आहे. तिने केवळ 84 डावांमध्ये 7 वनडे शतके केली आहेत. दुसरीकडे, मितालीला 7 शतके झळकावण्यासाठी 211 डाव लागले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article