महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रेतांकडून केले जाते धूम्रपान

06:20 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धूम्रपान, अर्थात सिगरेट किंवा बिडी ओढणे कोणत्याही जिवंत व्यक्तीच्या आरोग्याला वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने घातक आहे. म्हणून सिगरेटच्या पाकिटावर तसा वैधानिक इशारा छापलेला असतो. तथापि, इंडोनेशिया या देशातील एका जमातीत एक अनोखी प्रथा आहे. या जमातीतील व्यक्ती मृत झाली, की तिचे दफन करण्यात येते. काही काळानंतर तिचे थडगे उकरले जाते. त्यातून अस्थिपंजर झालेला त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात येतो. मृतदेहाला नवी कोरी वेषभूषा चढविली जाते आणि त्याच्या तोंडात पेटती सिगरेट ठेवली जाते. म्हणजेच त्याच्याकडून धूम्रपान करवून घेतले जाते. आपल्या मृत पावलेल्या प्रियजनांचे स्मरण करण्याची या जमातीची ही अशी रीत आहे.

या जमातीला तोरजा जमात म्हणून ओळखले जाते. मृत पावल्यामुळे निर्जीव झालेल्या व्यक्तींनाही सजीव मानण्याची या जमातीत प्रथा आहे. त्यामुळे सजीव माणसाला ज्या आवडीनिवडी असतात किंवा त्याला ज्या सवयी असतात, त्या मृत पावून निर्जीव झालेल्यांनाही असतात, असे या जमातीत दृढपणे मानले जाते. इतकेच नाही, तर या जमातीतील कोणतीही व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या मृत्यूचे दु:ख मानले जात नाही. उलट आनंदोत्सव साजरा केला जाते. तसेच मृत शरीराचे दफन त्वरित केले जात नाही. काही दिवसानंतर दफन केले जाते. ऑगस्ट महिन्यात धान्य पेरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मृतदेहांना थडग्यांमधून बाहेर काढण्याचा सोहळा करण्यात येतो.
Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article