महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानसह आखाती देशांमध्ये धुवाँधार!

06:25 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, दुबई

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान, ओमान आणि यूएईमध्ये बुधवारी दुपारपर्यंत 69 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तेथे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान दुबईतील खराब हवामानामुळे भारतातून 28 उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये भारतात येणाऱ्या 13 आणि भारतातून दुबईला जाणाऱ्या 15 फ्लाईट्सचा समावेश आहे.

Advertisement

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सर्व प्रांतात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून शेती आणि संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक भागांचा संपर्कही तुटला आहे. घरांचीही पडझड झाली असून अनेक लोक बेपत्ता आहेत. निर्वासित लोकांच्या राहण्याची व्यवस्था ऊग्णालयात केली जात आहे. हवामान खात्याने लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पूरग्रस्त भागातील लोकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवले जात आहे.

पाकिस्तानच्या हवामान खात्याने 22 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. दक्षिणेकडील प्रांतांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. या वादळामुळे बलुचिस्तानमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. खैबर पख्तूनख्वामधील चित्राल, दार, स्वात, अॅबोटाबादमध्ये अधिक नुकसान होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानच्या इतर अनेक प्रांतांसाठीही पुराचा इशारा देण्यात आला आहे.

दुबईत वर्षभराचा पाऊस दोन दिवसात कोसळला

अबुधाबी, दुबई आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) च्या अल ऐन सारख्या शहरांनाही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या पट्ट्यात वर्षभराचा पाऊस 2 दिवसांतच कोसळला. या पावसामुळे मंगळवारी रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा प्रभावित झाली हाती. या शहरांमधील कार्यालये आणि शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना घरून काम करण्यास सांगितले आहे. खराब हवामानामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत. दुबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी चेक-इन प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. बहरीन, कतार आणि सौदी अरेबियामध्येही मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मस्कतसह देशातील अनेक भागात परिस्थिती बिकट आहे. येथे तीन दिवसांत 5 इंच पावसाची नोंद झाली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article