महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धुसफूस वाढणार

06:28 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष तसेच आघाडी आणि युतीने संभाव्य जागांबाबत आढावा सुरू केलेला असतानाच भाजपतील कोकणातील निलेश राणे यांच्या नाराजी नाट्यानंतर आता मुंबईतील शिंदे गटातील रामदास कदम विरूध्द गजानन किर्तीकर यांच्यातील धुसफूस समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीला अवकाश असतानाच आता पक्षांर्तगत मतभेद समोर यायला लागले असून भविष्यात ही पक्ष नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Advertisement

राज्यातील यापूर्वीच्या लोकसभा निवडणूका बघता आघाडी विरूध्द युती असा थेट सामना होऊन 48 जागांसाठी लढत होत असे, मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता मात्र चित्र बदलले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांर्तगत नाराजी तसेच धुसफुस समोर यायला सुरूवात झाली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले, या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी सरकारमध्ये धमाकेदार एन्ट्री करत आपल्या मंत्र्यांसह शपथ घेतली मात्र, त्यानंतर अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यातील मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मात्र मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख मिळत आहे. त्यामुळे महायुतीतही महानाराजी आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागांवर नियुक्ती नाही, महामंडळ नाही, मंत्रीपदे नाही त्यामुळे आता जी जबाबदारी मिळेल त्यातून इन होण्याच्या इर्षेने काही जणांनी थेट लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. कारण लोकसभा निवडणूक हरलो तर पुढे पुन्हा विधानसभा निवडणूक लढवता येते किंवा लोकसभेला तिकीट नाकारले तर किमान विधानसभेची तरी हमी मिळते. त्यातूनच आता लोकसभा लढविणाऱ्या इच्छुक आणि उत्सुकांची संख्या वाढणार आणि हीच उत्सुकता पक्षासाठी आणि पक्ष नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Advertisement

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी मित्रपक्षांसोबत 45 जागा जिंकण्यासाठी भाजपने महाविजय मिशनची तयारी केलेली असताना तिकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाने शिवसेनेसोबत युतीत असताना 2019 साली लढविलेल्या 22 जागांवर दावा केलेला आहे. मुंबईतील भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या 3 तर अरविंद सावंत खासदार असलेली दक्षिण मुंबईची एक अतिरीक्त जागा अशा एकुण 4 जागा भाजप लढणार असून त्यादुष्टीने तयारी सुरू केली आहे तर शिंदे गटाच्या वाट्याला विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची दक्षिण मध्य मुंबई आणि गजानन कीर्तिकर खासदार असलेले उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागा वाट्याला येण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवऊन शिंदे गटातील धुसफूस समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघावर दावा केला आहे. कीर्तिकर लढणार नसेल तर आपले चिरंजीव सिद्धेश कदम तिथून लढतील असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यावरून गजानन कीर्तिकर यांनी एका कुटुंबात दोन भावांना तिकीट देता येईल का? पक्षाला तरी ते परवडेल का? आणि अजून मी माघार घेतलेली नाही. मी मैदानात आहे, अशा रोखठोख शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात असल्याने त्यांनी शिंदे गटात यावे यासाठीसुध्दा हे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्यानंतर खासदाराने दत्तक गावे घेण्याची योजना होती त्यावेळी कीर्तिकरांनी राष्ट्रवादीचा तत्कालीन आमदार असलेल्या संजय कदम यांच्या दापोलीतील काही गावे दत्तक घेतली होती. त्यावेळी कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल हे दापोली विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविली जात असताना 2019 ला रामदास कदम यांनी आपल्या मुलासाठी ही जागा घेतली या मतदार संघातून कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी विधानसभेची निवडणूक लढविली आता तर थेट कीर्तिकरांच्याच जागेवर रामदास कदम यांनी दुसऱ्या मुलासाठी दावा केल्याने शिंदे गटात धुसफुस वाढलीय. खासदार गजानन कीर्तिकर  बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार बुध्दीजीवी मराठी माणसांना शिवसेनेकडे वळविण्यात ज्या स्थानिय लोकाधिकार समितीने महत्त्वाची भूमिका बजावली त्यात कीर्तिकर याचे मोठे योगदान राहीले. त्यांनी शिवसेना लोकाधिकार आणि मी पुस्तक लिहीले असून बाळासाहेब ठाकरे तसेच उध्दव ठाकरे यांची कार्यपध्दती तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड यावर परखडपणे लिहिले आहे. 1995 ला शिवसेनेचे सरकार आले मात्र त्याआधी विधानपरिषद निवडणूक लढविणे त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि पीठासिन अधिकारी म्हणून त्यांनी शिवसेनेची भक्कमपणे बाजू त्यावेळी सांभाळली. मात्र आता पक्षाचे नेतृत्व बदलल्याने त्यांना आपलीच बाजू मांडण्याची वेळ आली आहे. कोकणात माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेनंतर त्यांची मनधरणी करण्यात आली असली तरी कालच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी मंत्री दिपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत हजर असताना सिंधुरत्न समफध्द योजना कार्यालयाचे उदघाटन केले. किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणे हेही खूप काही सांगून जाते. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसची असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. रावेरच्या लढाईत

काँग्रेसला प्रत्येकवेळी अपयश आलंय. त्यामुळं रावेरची जागा राष्ट्रवादीला देण्याचा आग्रह खडसेंनी केला. रावेरसाठी धनुष्यबाण उचलण्यास मी तयार असल्याचंही खडसे म्हणाले. विशेष म्हणजे रावेरच्या विद्यमान खासदार या खडसे यांच्या सुन रक्षा खडसे आहेत, त्यामुळे राज्यातील झालेले सत्तांतर पडलेले गटतट बघता आघाडी आणि युतीतील धुसफुस वाढणार, हे नक्की.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article