‘हाउस ऑफ लाइज’द्वारे स्माइलीचे पुनरागमन
स्माइली सूरीने स्वत:च्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात 2005 साली कलयुग या चित्रपटाद्वारे केली होती. स्वत:चा भऊ मोहित सूरीच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. यानंतर ती ‘तिसरी आंख द हिडन कॅमेरा’, ‘ये मेरा इंडिया’ आणि ‘क्रूक’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. तिने जोधा अकबर या मालिकेतही काम केले होते. अभिनेत्री आता दीर्घकाळानंतर ओटीटीद्वारे पुनरागमन करत आहे.
स्माइली आता ‘हाउस ऑफ लाइज’ नावाच्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अलिबागमध्ये 15-20 दिवसांमध्ये पूर्ण केले होते. चित्रिकरणादरम्यान संजय कपूर आणि ऋतुराज सिंह यांच्याकडून खूप काही शिकता आल्याचे स्माइलीने सांगितले.
चित्रपटाच्या टीममध्ये बहुतांश लोक युवा होते, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी होता. सद्यकाळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जे मुद्दे पूर्वी उपस्थित करता येत नव्हते, ते आता ओटीटीच्या माध्यमातून उपस्थित करता येतात असे स्माइलीचे सांगणे आहे.