स्मार्टफोन वन प्लस-13 नव्या वैशिष्ट्यांसह होणार दाखल
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनी कंपनीचा वन प्लस-13 हा नवा स्मार्टफोन चौकोनी कॅमेरासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासह दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उत्तम बॅटरी क्षमता, उत्तम प्रतिचा फास्ट चार्जर यासह इतर वैशिष्ट्यांसह हा फोन सादर होणार आहे.
वन प्लसच्या सध्याच्या मोबाईल स्मार्टफोनमध्ये गोल आकाराचा कॅमेरा आहे. आत्ता यामध्ये बदल करत कंपनी चौकोनी आकाराचा कॅमेरा आगामी वन प्लस 13 मध्ये देणार असल्याची माहिती आहे. वन प्लस 11 आणि 12 मध्ये रिंग स्टाईल फ्रेम कॅमेरा देण्यात आला होता. वन प्लस 13 नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सदरचा फोन हा पूर्णपणे सिरॅमिक बॉडीने युक्त असणार आहे.
प्रोसेसर व बॅटरी क्षमता
यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जन 4 चीप बसवलेले असणार असून 5400 एमएएच क्षमतेची बॅटरीदेखील यात असणार आहे. 100 वॉटचा फास्ट चार्जर यामध्ये असेल असेही सांगितले जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची वैशिष्ट्योदेखील या नव्या फोनमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती पुढे येते आहे.