For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेडमी 13 5जी स्मार्टफोन येणार लवकरच

06:29 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेडमी 13 5जी स्मार्टफोन येणार लवकरच
Advertisement

किंमत 12 हजाराच्या पुढे : 108 मेगापिक्सलचा कॅमेरा

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

शाओमीचा नवा स्मार्टफोन रेडमी 13 5जी भारतामध्ये लवकरच लॉन्च केला जाणार आहे. सदरचा नवा स्मार्टफोन पुढील महिन्यामध्ये भारतात सादर केला जाऊ शकतो अशीही माहिती पुढे येते आहे.

Advertisement

रेडमी 12 5जी फोनच्या यशस्वीतेनंतर रेडमी 13 5जी हा स्मार्टफोन कंपनी सादर करत आहे. कंपनीने यापूर्वी रेडमी 12 4जी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये बाजारात उतरवला होता. सदरच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मिळालेल्या माहितीनुसार रेडमी 13 5जी हा स्मार्टफोन 7 जुलै रोजी लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनला चमकदार ग्लास फिनिश असून ड्युअल कॅमेरा देण्यात आलेला आहे. याशिवाय एलईडी फ्लॅश युनिटसोबत निळ्या आणि गुलाबी रंगांमध्ये हा स्मार्टफोन बाजारात येणार आहे.

स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा असणार असून अँड्रॉइड 14 वर आधारित हायपर ऑपरेटिंग सिस्टीम असेल. 33 वॅटच्या फास्ट चार्जिंग सुविधेसोबत या स्मार्टफोनला 5030 एमएएच क्षमतेची बॅटरी असणार आहे. 6.79 इंचाची फुल एचडी प्लस एलसीडी क्रीन यामध्ये असेल. किमत 12 हजारपासून पुढे असणार आहे.

Advertisement
Tags :

.